देवळा प्रतिनिधी : नगरपंचायत निवडणुकीनंतर गटनेते व नगराध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागून होते, देवळा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यानंतर भाजपा गट नेते पदी संजय(संभा दादा ) आहेर यांची वर्णी लागली असून त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
नगरपंचायत निवडणूक एकतर्फी होत भाजपाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं, विरोधकांची दाणादाण उडवत तालुक्यात भाजपाच असल्याचे केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सिद्ध केलं. नगरपंचायत गाडा हाकताना सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवत पाच वर्ष गाडा हाकण्यासाठी गटनेता हा महत्वाचा भाग असल्याने भाजपा जिल्ह्याध्यक्ष केदा आहेर यांचे बंधू संभा आहेर यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.
संभा आहेर यांच्या भोवती कार्यकर्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. विकास कामांसाठी मी प्रयत्नशील असेल अशी प्रतिक्रिया आहेर यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम