🖋️ अंकुश सोनवणे / संकलन -सोमनाथ जगताप
द पॉईंट नाऊ विशेष ; देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून इच्छुकांनी मतदारांसह आपल्या पक्ष नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तालुक्यात भाजपाकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे . त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस व शिवसेना यांच्याकडे मात्र फारसा उत्साह दिसत नाही. तालुक्यात भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना रंगण्याची चिन्हे आहेत. गेल्या निवडणुकीत स्थानिक आघाड्या करण्यात आल्या होत्या .मात्र यावेळी परिस्थिती वेगळी असून पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा मानस उमेदवारांचा दिसून येतो आहे .
संभाव्य लढतीन मध्ये आपण प्रत्येक प्रभाग निहाय आढावा घेणार आहोत. आज आपण प्रभाग क्रमांक १३ मधील संभाव्य उमेदवार कोण असतील याची चाचपणी केली असता, या ठिकाणी काटे टक्कर होईल असेच चित्र आहे, गेल्या निवडणुकीत देखील सर्वाधिक चर्चेत असलेली निवडणूक याच वॉर्डात झाली होती. जाणकारांच्या मते यावळी देखील तुल्यबळ लढत या प्रभागात होणार असल्याचा कयास बांधला जात आहे. स्थानिक मतदार तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मत जाणून घेतले असता हा प्रभाग किती संवेदनशील आहे याचा प्रत्येय आला.
भाजपाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. यात माजी सरपंच स्व. दिनकर बापु आहेर यांचे पुत्र योगेश (नानू) आहेर स्वतः मैदानात उतरणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. याच वेळी भाजपा तर्फे अशोक संतोष आहेर, पप्पू हिरे हे देखील इच्छुक असल्याची माहिती चर्चेतून समोर आली आहे. या तिघांपैकी भाजपाचे तिकीट कोणाच्या पारड्यात पडते हे बघणे महत्वाचे असेल. या ठिकाणी भाजपात तिकीट वाटपावरून बंडखोरी होण्याची चिन्हे देखील आहेत. यामुळे ज्याला तिकीट मिळेल त्यांना अन्य दोघांची मदत होईल का ? तसेच डॅमेज कंट्रोल कसा होणार यावर या प्रभागात उमेदवाराचे भविष्य अवलंबून असेल. भाजपा नेतृत्वासमोर या प्रभागात तिकीट देतांना मोठे डॅमेज कंट्रोल करावे लागणार आहे. तिकीट देतांना उमेदवाराचे आर्थिक पाठबळ, भाऊबंदकी, जनसंपर्क, सामाजिक कार्य, पक्ष निष्ठा ,नेतृत्व निष्ठा या सर्व बाबी तपासताना नेतृत्वाचा कस लागणार आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष याच प्रभागात असून, गेल्या निवडणुकीत त्यांनी एका रात्रीतुन निकालाचे परिवर्तन घडवून आणले होते, या प्रभागात त्यांचा दबदबा आहे, तसेच जनसंपर्क देखील कायम असल्याने त्याचा फायदा त्यांना असणार आहे, सुनील आहेर उर्फ गोटु आबा स्वतः मैदानात उतरतील अशी चर्चा नागरिकांमध्ये दिसून आली. मात्र त्यांच्यातर्फे या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही, राष्ट्रवादी पक्षातर्फे स्वतः गोटु आबा किंवा त्यांचे बंधू प्रफुल्ल(बापू) आहेर मैदानात असतील अशी चर्चा आहे. त्यांचा वॉर्डातील भाऊबंदकी, नातेवाईक, केलेले काम हे घेऊन मतदारांसमोर जातील. राष्ट्रवादी पक्षाचे पाठबळ घरात जिल्हा परिषद सदस्य या सर्व जमेच्या बाजू आहेत.
जर समजा भाजपा तर्फे योगेश (नानू) आहेर यांना तिकीट दिले, व राष्ट्रवादी तर्फे सुनील (गोटु आबा) हे उभे राहिल्यास ही लढत अतिशय काटे की होईल . शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम असेल. या निवडणुकीतील ‘हाय व्होल्टेज’ निवडणूक याच वॉर्डात होईल. खुद्द गोटु आबा उभे राहिले तर भाजपा जिल्हा नेतृत्व पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पराभवाचे पेढे वाटण्यासाठी मैदानात उतरेल हे ही तितकेच खरे आहे.
बाकी प्रभागातील लढती अजून स्पष्ट नसल्या तरी १३ मध्ये मात्र या संभाव्य उमेदवारांमध्ये फारसे बदल होतील असे वाटत नाही. विकासाच्या मुद्द्यापेक्षा वैक्तिक संबंधांवर निवडणूक होणार आहे. यामुळे लढत मजेदार अन इंटरेस्टिंग असणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम