देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवार (दि .३) रोजी १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आतापर्यंत एकूण चार प्रभागांसाठी २७ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सी. एच.देशमुख व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली.
ओबीसी आरक्षणामुळे स्थगित झालेल्या व आता सर्वसाधारण जागांसाठी असलेल्या येथील चार प्रभागांची निवडणूक प्रक्रिया चालू आहे. यात प्रभाग चार व प्रभाग आठ हे महिलांसाठी राखीव असून १० व १३ हे प्रभाग सर्वसाधारण आहेत. उमेदवारांनी पक्ष व अपक्ष असे दोन्ही पध्दतीने अर्ज दाखल केले आहेत.
यात प्रभाग ४ मधून योगिता सूर्यवंशी (राष्ट्रवादी ), सुलभा आहेर (भाजप व २ अपक्ष), अंजना आहेर (राष्ट्रवादी), आश्विनी आहेर (भारतीय संग्राम परिषद);
प्रभाग ८ मधून भारती आहेर (भाजप व अपक्ष ), शीतल अहिरराव (भारतीय संग्राम परिषद), यमुनाबाई आहेर (राष्ट्रवादी व अपक्ष);
प्रभाग १० मधून करण आहेर (भाजप व अपक्ष), शेख नईम अहमद समीर (अपक्ष), अशोक देवराम आहेर (भाजप व अपक्ष), राजेंद्र आहेर (राष्ट्रवादी), उल्हास गुजरे (अपक्ष)
प्रभाग १३ मधून देविदास हिरे (अपक्ष), योगेश दिनकर आहेर (भाजप व अपक्ष), अशोक संतोष आहेर (भाजप व २ अपक्ष), प्रफुल्ल आहेर (अपक्ष), राजेंद्र आहेर (राष्ट्रवादी व अपक्ष) या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शनिवारी व रविवारी सुट्टी होती म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसून आली.
मंगळवार (दि.४) रोजी छाननी होणार असून, माघारीची अंतिम मुदत ( दि १०) आहे.
यापूर्वी या नगरपंचायतीची १३ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून आता उर्वरित चार जागांसाठी सदर निवडणूक होत आहे. एन थंडीच्या दिवसांत देवळा शहरात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून , राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे . माघारी नंतर खरे चित्र स्पष्ट होईल .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम