देवळा प्रतिनिधी ; देवळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी( दि ३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसा अखेर तीन उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सि एच देशमुख यांनी दिली .
यात प्रभाग क्रमांक ४ मधून माजी सरपंच सुलभा जितेंद्र आहेर , प्रभाग क्रमांक ५ मधून माजी सरपंच व गटनेते जितेंद्र रमण आहेर, प्रभाग क्रमांक १७ मधून प्रकाश तारू आहेर या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार दि ७ पर्यंत असून , उद्या शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याने उर्वरित पुढील दोन दिवसांत सोमवार ,मंगळवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी होण्याची शक्यता आहे . नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवळा शहरात राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, पुढील रणनीती ठरविण्यासाठी राजकीय पक्षाच्या गुप्त बैठका घेतल्या जात असून, भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे . खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम