देवळा : महाराष्ट्रातील नगरपंचायत , नगरपरिषद व संवर्ग कर्मचा – यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक २ मे २०२२ पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद , नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे .
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे . निवेदनाचा आशय असा कि , महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका , नगरपरिषदा व नगरपंचायतीतील कर्मचा – यांचे विविध मागण्यांबाबत कामगार संघटनांच्या संघर्ष समितीचे पदाधिकारी यांचे समवेत मुख्यमंत्री व प्रधान सचिव यांची दि . ११/०८/२०१७ व दि . २४/०८/२०१७ रोजी व आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय वरळी मंबई यांच्या समवेत दिनांक १ सप्टेंबर २०१ ९ रोजी बैठक झाली होती .
या बैठकीमध्ये विविध विषयाबाबतच्या झालेल्या निर्णयावर अद्याप पावेतो शासनाने निर्णय न घेतल्यामुळे तसेच महाराष्ट्रातील सर्व संघटनेच्या वतीने यापूर्वी दिलेल्या निवेदनावर देखील शासनाकडून चर्चा करण्यात आली नसल्यामुळेयेत्या दि . २ मे २०२२ पासून कर्मचा – यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व मागण्या मंजुर व्हाव्यात यासाठी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती येथील सिटुचे सुधाकर आहेर व सुरेश आहेर यांनी दिली आहे . तरी नगरपंचायत कर्मचा – यांनी संप यशस्वी करावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम