देवळा नगरपंचात मध्ये भाजपची सत्ता ; नगराध्यक्ष पदी भारती आहेर तर उपनगराध्यक्ष पदी जितेंद्र आहेर

0
29
देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भारती आहेर ,उपनगराध्यक्ष पदी जितेंद्र आहेर यांच्या निवडीनंतर हात उंचावून अभिनंदन करतांना गटनेते संभाजी आहेर , मनोज आहेर ,अशोक आहेर ,भाग्यश्री पवार शीला आहेर आदी नगरसेवक ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : देवळा नागरपंचातीच्या नगराध्यक्ष पदी भारती अशोक आहेर यांची तर उपनगराध्यक्ष पदी जितेंद्र रमण आहेर यांची बिनविरोध निवड झाली . आज मंगळवारी( दि १५) रोजी सकाळी ११ वाजता सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सी एस देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवडून आलेल्या सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली .

देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भारती आहेर ,उपनगराध्यक्ष पदी जितेंद्र आहेर यांच्या निवडीनंतर हात उंचावून अभिनंदन करतांना गटनेते संभाजी आहेर , मनोज आहेर ,अशोक आहेर ,भाग्यश्री पवार शीला आहेर आदी नगरसेवक ( छाया -सोमनाथ जगताप )

यावेळी नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार सौ. भारती अशोक आहेर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले . त्यांना सूचक म्हणून संजय आहेर यांनी तर अनुमोदन म्हणून अशोक आहेर यांनी स्वाक्षरी केली . तर अनुक्रमे उपनगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र आहेर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली . त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून भाग्यश्री पवार यांनी तर अनुमोदन म्हणून करण आहेर यांनी स्वाक्षरी केली . नगराध्यक्ष व उप नगराध्यक्ष निवड घोषित होताच समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला .

याप्रसंगी गटनेते संजय उर्फ संभाजी आहेर , अशोक आहेर , करण आहेर , मनोज आहेर , कैलास पवार ,भूषण गांगुर्डे , सुलभा आहेर ,सुनंदा आहेर ,भाग्यश्री पवार ,शीला आहेर ,रत्ना मेतकर ,आश्विनी चौधरी , राखी भिलोरे , विरोधी गटनेते संतोष शिंदे ,ऐशवर्या आहेर उपस्थित होते . नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार डॉ राहुल आहेर ,केंद्रीय राज्य मंत्री ना डॉ भारती पवार , जिल्हाध्यक्ष केदा आहेर , तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण , शहर अध्यक्ष अतुल पवार , भाऊसाहेब पगार ,प्रवीण मेधने ,पवन अहिरराव , डॉ प्रशांत निकम ,डॉ ललित मेतकर, किशोर आहेर , अनिल आहेर , रोशन अलीटकर ,बाबाजी निकम , प्रतीक आहेर , हर्षद भामरे आदींनी अभिनंदन केले आहे .

नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ भारती आहेर ह्या माजी सरपंच, बाजार समितीचे माजी सभापती, पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच माजी उपनगराध्यक्ष ,शारदा देवी ज्ञान विकास मंदिर संस्थापक अध्यक्ष अशोक आहेर यांच्या सुविध्य पत्नी आहेत.

देवळा नगरपंचायत मध्ये 17 पैकी 15 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. यापैकी आठ महिला नगरसेवक विजयी झालेल्या आहेत. देवळा नगरपंचायतीचे अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव झाल्याने नगराध्यक्ष होण्यासाठी मोठी चुरस निर्माण झालेली होती.भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी सोमवारी नगरसेवकांची बैठक घेऊन नगराध्यक्ष पदासाठी सन्माननीय तोडगा काढून जि प च्या माजी सदस्या सौ .भारती आहेर यांना प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान दिला आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here