देवळा, दिंडोरी अन निफाड मध्ये झाले इतके मतदान

0
14

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : आज लोकशाहीच्या उत्सवात मतदार सहभागी होत आहेत. नगरपंचायत निवडणूकीत ओबीसी आरक्षित जागांवरील निवडणूक स्थगित केल्यानंतर या जागांवर सर्वसाधारण उमेदवार उभे करण्यात आले असून आज मतदान तर उद्या निकाल जाहीर होणार आहे.

डिसेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये मतदान झाले होते. यानंतर ११ जागांवरील मतदान आरक्षणामुळे स्थगित करण्यात आले होते.

ओबीसीमुळे रखडलेल्या जागेवर याआधीच देवळ्यातील एक आणि कळवणमधील दोन अशा तीन जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे उर्वरित आठ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे.

यामध्ये निफाडमध्ये तीन, दिंडोरीत दोन तर देवळ्यात तीन जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. देवळा तालुक्यात भाजपा, शिवसंग्राम, राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होत आहे.

सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर 11.30 वाजेपर्यंत देवळ्यात 27. 58 टक्के मतदान झाले.
तर निफाडमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 666 मतदारांनी मतदान केले.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here