द पॉईंट प्रतिनिधी :देवळा तालुक्यातील दहिवड गावात सध्या भीतीचे वातावरण आहे. कारण भवरी मळा दहिवड परिसरातील नागरिकांना सिंह सदृश्य प्राणी आढल्याची माहिती आहे. नागरिकांनी हिंस्र प्राण्यांचे वर्णन केल्या नुसार आरएफओ पाटील देवळा यांनी दखल घेऊन वन विभाग कर्मचारी आर आर साळुंखे , एम एम साळुंखे व आदी कर्मचारी भवरी मळा दहिवड येथे गस्तीवर असुन देवळा वन विभाग मार्फत लाउड स्पिकरवर दवंडी देण्यात आली आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. प्राणी नेमका कोणता आहे निष्पन झालेलं नसले तरी नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घेणं गरजेचं आहे.
नागरिकांना आवाहन करतो कि, सदरील बाबी संदर्भात नागरिकांनी सर्तक राहून आपली जिवापाड प्रेम असलेली जनावरे लहान बालके तरूण तुर्क म्हातारे अर्क यांना यांना सर्तकतेने जपावे. घराबाहेर पडतांना बॅटरी प्रकाशमान प्रहार ठेवावी.
श्री संजय दहिवडकर
तालुकाध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना देवळा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम