देवळा तालुक्यात एकाच दिवशी 65 कोरोनाचे नवे रुग्ण

0
65

देवळा प्रतिनिधी : तिसऱ्या लाटेत कोरोनाने थैमान घातले असून तालुक्यात तिसऱ्या लाटेत करोनाचा उद्रेक वाढताना दिसून येत आहे. रविवारी नवीन 65 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात एकाच दिवशी इतकी मोठी संख्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढले आहे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी तब्बल 65 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रोजचा आकडा वाढता पाहता कोरोना बाधितांची शतकाकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोहणेर – 18
देवळा – 15
रामेश्वर – 9
वाजगाव – 8
उमराने -1
गुंजाळवाडी – 2
माळवाडी – 2
खामखेडा – 1
व अन्य काही गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here