देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील कायदा सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे, पोलिसांच्या खाकीचा धाक उरलेला नाही. पोलीस निरीक्षक सन्मानीय लांडगे यांनी निवडणुकीच्या तोंडावर चार्ज घेतल्यानंतर निवडणूक निकाल व त्यानंतरची परिस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली व त्यांचे कौतुक देखील झाले मात्र त्यानंतर त्यांच्या कारभाराला कुणाची नजर लागली कुणास ठाऊक जानेवारीपासून दुचाकी चोरांनी अक्षरशः तालुक्यात हैदोस घातला आहे, तर दुसरीकडे पोलीस मात्र बघ्याची भूमिकेत आहेत का असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत.
तालुक्यात दुचाकीचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, टोळी तालुक्यात सक्रिय झाली असून शहरात बसवलेले सीसीटीव्ही नावाला आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय, पोलीस चौकशी करतांना टाळाटाळ करत असल्याची चर्चा सर्वसामान्य करताय, तर दुसरीकडे पोलीस चौकशी सुरू असल्याचे सांगत आहेत, देवळ्या सारख्या सुशिक्षित तालुक्यात असल्या घटना होत असतील तर तालुक्यात पोलिसांचा धाक नावालाच असेल व भविष्यात चोरीचा हा वेग असल्यास नागरिकांनी बिहारसोबत तुलना केल्यास नवल वाटायला नको.
देवळा पोलीस म्हटल्यावर गुन्हेगारांना एक वेगळीच भीती असायची तो दरारा आज कुठे गेला असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची असलेली अपुरी संख्या देखील दखल घेण्याजोगी आहे, कारण तालुक्याची सुरक्षा अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाती आहे. याकडे देखील वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करून या चोरांना आळा कसा घालता येईल यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचे आहे.
पोलीस सूत्र असतात तसेच गोपनीय विभागाला चोरांचा सुगावा लागत नसेल तर नेमकी यंत्रणा कुठं चुकतेय हा प्रश्न उभा राहतोय, गोपनीय विभागातील कर्मचारी डॅशिंग असून त्यांचा तालुक्यात वचक आहे, तरी देखील चोरट्यांचे फावत असेल तर हा प्रकार चिंताजनक आहे, तालुक्याबाहेरील चोरट्यांची टोळी सक्रिय झाली की काय असे प्रश्न निर्माण होत आहेत.
पोलिसांनी खाकीचा धाक दाखवत अनेक प्रकरण चुटकीनीशी सोडवले आहेत मात्र, बाईक चोरीत पोलीस मात्र सपशेल अपयशी ठरतांना दिसत आहेत. यावर पोलिसांनी अक्टिव्ह होत धडाकेबाज कारवाई करणे जनतेला अपेक्षित आहे.
बऱ्याचशा दुचाकी ह्या मंगल कार्यालय, व लॉन्सच्या बाहेरून चोरीस गेल्या आहेत, संबंधित व्यक्तींशी बैठक घेऊन सीसीटीव्ही बसवण्याची विनंती करू जेणेकरून चोरीला आळा घालता येईल. नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांशी देखील बैठक घेऊन या संदर्भात तोडगा काढून शहरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रयत्न करू, दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शिक्षा करू, जेणेकरून पुन्हा अशा घटना उद्भवणार नाही. पेट्रोलिंग देखील शहरात वाढवली असून सर्व यंत्रणा कार्यान्वित केली आहे लवकर या प्रकरणाचा छडा लावू नागरिकांनी देखील बाईक पार्क करतांना सतर्क रहावे लॉक करावी.
– दिलीप लांडगे , पोलीस निरीक्षक देवळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम