देवळा प्रतिनिधी: देवळा तालुका सरपंच सेवा महासंघाच्या अध्यक्षपदी दहिवड येथील लोकनियुक्त सरपंच आदिनाथ ठाकूर यांची तर खर्डे येथील प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांची देवळा तालुका निरीक्षक पदी सर्वानुमते निवड करण्यात आली .
शुक्रवारी( दि २०)रोजी चांदवड येथे सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपर्क अभियान व नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली . चांदवड येथील शासकीय विश्रामगृहावर राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील तसेच राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मस्के पाटील ,सोशल मीडिया प्रमुख भाऊसाहेब कळसकर आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत सरपंच सेवा संघाची बैठक संपन्न झाली .
यावेळी संघाच्या कार्यक्रमाची रूपरेषा व नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येऊन नियुक्ती पत्र देण्यात आले . यात दहिवड येथील लोकनियुक्त सरपंच आदिनाथ ठाकूर यांची देवळा तालुका सरपंच सेवा महासंघाच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष म्हणून पिंपळगाव वाखारीचे नदीश थोरात , कोषाध्य पदी डोंगर गावचे दयाराम सावंत, कार्याध्यक्ष पदी चिंचवे येथील लोकनियुक्त सरपंच रविभाऊ सावंत यांची तर खर्डे येथील प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांची तालुका निरीक्षक पदी निवड करण्यात आली .
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राज्य मंत्री बच्चू कडू, पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार डॉ राहुल आहेर,भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदा आहेर , प्रहारचे राज्य राज्य संपर्क प्रमुख दत्तू बोडके ,देवळा बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर, खुंटेवाडीचे उपसरपंच भाऊसाहेब पगार, गटनेते जितेंद्र आहेर, उपनगराध्यक्ष अतुल पवार,प्रहारचे बापु देवरे, भाऊसाहेब मोरे ,शशिकांत पवार , सरपंच सेवा महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष दत्तात्रेय वाघचौरे, पुरुषोत्तम घोगरे, भाऊसाहेब कळसकरे,बाळासाहेब म्हस्के आदींनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम