देवळा : येथील नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. १७ मधिल खरड वस्ती येथे जलकुंभाचे भूमिपूजन आमदार डॉ राहुल आहेर व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.

देवळा – खर्डे रोडवरील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात असलेल्या खरड या आदिवासी वस्तीवर पिण्याच्या पाण्याची टाकी नसल्याने येथील रहिवाशांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परवड झाली आहे .यामुळे “धरण उशाशी कोरड घश्याची” अशी अवस्था येथील नागरिकांची झाली आहे . ही परवड थांबविण्यासाठी या प्रभागातील नगरसेवक मनोज आहेर यांच्या पुढाकारातून व आमदार डॉ राहुल (दादा) आहेर ,भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा (नाना) आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून ५ लक्ष किमतीच्या जलकुंभाचे मंगळवारी ३ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन करण्यात आले .
या कामाचे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे . या प्रसंगी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, नगरसेवक मनोज (दादा) आहेर , ,कैलास पवार, करण आहेर, भूषण गांगुर्डे आदींसह तुळशीराम आहेर,दिपक आहेर,केदा वाघ, बाबाजी माळी, द्यानेश्वर आहेर, विनोद जाधव, पंडीत भामरे, अनिल भामरे, जितेंद्र भामरे, अनिल आहेर, वसंत आंबेकर आदी नागरिक उपस्तीथ होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम