देवळा कळवण रस्त्यावर अपघात एक जण जागीच ठार दोन जण जखमी

0
40

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा-कळवण रस्त्यावर भऊर फाट्यानजीक गुरुवारी (दि.२१) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास टॅगो कार व ट्रक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले.

देवळा -कळवण रस्त्यावर भऊर फाट्यानजीक टॅगो कार व ट्रक्टर यांच्यात झालेल्या अपघातात कारची झालेली दुरावस्था (छाया – सोमनाथ जगताप )

देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात विनय रमेश पाटील ( २८) रा मोकभणगी ता कळवण युवक ठार झाला . तर यशवंत दत्तू पवार (४२),सुखदेव आण्णा गायकवाड ,(३५) दोघे रा शिरसमनी हे जखमी झाले असून,त्यांना पुढील उपचारार्थ मालेगावला खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले .

अपघात इतका भीषण होता कि ट्रोली रस्त्याच्या एका बाजूला तर ट्रक्टर दुसऱ्या बाजूला फेकले गेले . तर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . याबाबत देवळा पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , शिरसमनी ता.कळवण येथील शेतकरी व अजून एक जण देवळा येथे मेथीची भाजी विकून ट्रक्टर चालवत कळवणकडे जात होते. त्याच वेळी भऊर फाट्याजवळ देवळ्याकडून कळवणकडे जाणाऱ्या टॅगो कारने ( एम एच ४१ -एझेड ४५१ ) या ट्रक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे ट्रक्टर फिरून ट्रोलीपासून अलग झाले व रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कलंडले. तर कारचा पुढचा भाग चेपला जात कारमधील विनय रमेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पाटील यांना तातडीने देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

यादरम्यान इतर वाहनांची वाहतून नसल्याने पुढील अनर्थ टळला अन्यथा अपघाताची तीव्रता वाढली असती. मृत विनय पाटील हे मोकभणगी ता.कळवण येथील असून ते वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी तज्ञ संचालक पांडुरंग पाटील यांचे नातू तर भऊर येथील आनंद अग्रोमधील अभियंता रमेश पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता . पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी हे करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here