द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यातील उच्चशिक्षित युवतीला जुन्नरच्या नराधमाने ब्लॅकमेल करत शारीरिक संबंध ठेवण्यास दबाव आणल्याची घटना घडली असून या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात संशयित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवती बाहेर गावी शिक्षणासाठी असतांना त्यांच्यात ओळख होऊन मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले असावे असा अंदाज आहे, मात्र ह्या मैत्रीमागे वासनाधीन नजरा त्या युवकाच्या स्पष्ट दिसत होत्या, सोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन समाजात बदनामी करेल, असे चोवीस वर्षीय युवतीला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार घडला, यासंदर्भात देवळा पोलीस ठाण्यात संबंधित युवका विरोधात आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवकाचे नाव सिद्धार्थ बाळू सोनवणे रा.साकुरी ता.जुन्नर जि.पुणे असे संशयित आरोपीचे नाव आहे.
देवळा पोलिसांत पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, गेल्या वर्षभरापासून या युवकाने पीडित चोवीस वर्षीय युवतीच्या नावाचे फेसबुकला दोन बनावट अकांउट बनवले त्यापैकी, एका अकांउटला युवतीसोबतचा फोटो ठेवून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअँप या सोशलमिडीयाच्या माध्यमाव्दारे तु जर माझ्याशी शरीर संबंध ठेवले नाही. माझ्याशी लग्न करायला नकार दिला. मला व्हाट्सअँप ला ब्लॉक केले किंवा माझेशी बोलणे बंद केले तर मी तुझ्या नावाचे आणखी बनावट अकाउंट उघडुन आपले फोटो व्हायरल करेल, तसेच तुझी नातेवाईकांमध्ये बदनामी करेल तुझे लग्न होवु देणार नाही, अशी धमकी देत युवतीला ब्लॅकमेलिंग करत असल्याचे पिडीत युवतीने म्हटले आहे.
याबाबत देवळा पोलीस ठाण्यात सिद्धार्थ बाळू सोनवणे रा.साकुरी ता.जुन्नर जि.पुणे याच्या विरोधात भादवी कलम ३५४(ड) ५०६ माहिती तंत्रज्ञान सन २००० च्या कलम ६६ क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास भोज करत आहेत.
समाजातील अशा प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे मात्र गरजेचं आहे. यामुळे भविष्यात अशी कोणाची हिम्मत होणार नाही हे तितकंच गरजेचं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम