देमको बँकेच्या चेअरमनपदी सौ . कोमल कोठावदे यांची तर व्हा . चेअरमनपदी डॉ प्रशांत निकम यांची बिनविरोध निवड

0
13

सोमनाथ जगताप

देवळा प्रतिनिधी : जिल्हा कार्यक्षेत्र व व्यापारी बँक म्हणून नावारूपास आलेल्या येथील दि देवळा मर्चन्ट को – ऑप बँकच्या चेअरमन पदी कोमल भारत कोठावदे यांची तर व्हाईस चेअरमन पदी डॉ . प्रशांत किसनराव निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली . बँकेच्या पदाधिकारी निवडीसाठी सोमवारी( दि ४)रोजी अध्यासी अधिकारी म्हणून सहायक निंबधक सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता बँकेच्या मिटींग हॉल मध्ये नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक आयोजीत करण्यात आली होती .

यावेळी चेअरमन पदासाठी कोमल भारत कोठावदे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली . त्यांना सूचक म्हणून जयप्रकाश कोठावदे यांनी तर अनुमोदन म्हणून भगवान बागड यांनी स्वाक्षरी केली . तर व्हा . चेअरमन पदासाठी डॉ प्रशांत निकम यांचाहि एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले . त्यांना सूचक योगेश वाघमारे म्हणून यांनी तर अनुमोदन म्हणून योगेश राणे यांनी स्वाक्षरी केली .

यावेळी संचालक सर्वश्री राजेंद्र सूर्यवंशी, प्रमोद शेवाळकर, जयप्रकाश कोठावदे ,योगेश वाघमारे, केदारनाथ मेतकर, भगवान बागड,अनिल धामणे , मयुर मेतकर , योगेश राणे, हेमंत अहिरराव ,राजेश मेतकर, अमोल सोनवणे , नलिनी मेतकर , मनिषा शिनकर, सुभाष चंदन आदींसह व्यवस्थापक गणेश ततार ,सहकार अधिकारी अनिल पाटील व सर्व कर्मचारी उपस्थित होते . नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार डॉ राहुल आहेर ,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर , बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर ,माजी सरपंच भाऊसाहेब पगार , उप नगराध्यक्ष जितेंद्र आहेर , गटनेते संभाजी आहेर , नगरसेवक मनोज आहेर ,माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार ,सचिन कोठावदे , राजेंद्र वडणेरे , भूषण कोठावदे ,पवन अहिरराव, प्रवीण मेधने ,विश्वनाथ गुंजाळ ,पंकज शेवाळे , हर्षद भामरे , आदींनी अभिनंदन केले आहे .

दि देवळा मर्चन्ट को – ऑप बँकेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक ६२ वर्षाच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध झाली . तसेच ६२ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला संचालिकेला चेअरमन पदाचा मान सौ . कोमल कोठावदे यांच्या रूपाने मिळाला आहे . कोमल कोठावदे ह्या येथील अमृतकार पतसंस्थेचे संस्थापक भारत कोठावदे यांच्या सुविद्य पत्नी असून ,त्या देखील अग्रगण्य अशा आशापुरी महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आहेत .सहकार क्षेत्रातील कामाच्या अनुभवामुळे चेअरमन सौ . कोठावदे यांच्यामुळे बँकेच्या भरभराटीसाठी निश्चितच फायद्याचे ठरणार आहे .

देमको बँकेचे जिल्हा कार्यक्षेत्र असल्याने सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बँकेच्या प्रगतीसाठी कामकाज करणार भर दिला जाईल , जास्तीत जास्त ठेवी जमा करून , सभासदांना कर्ज वाटप , वसुलीवर भर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे .यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे . – कोमल भारत कोठावदे , नूतन चेअरमन ,देमको बँक


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here