दुर्गा हॉटेल समोरील रस्ता बनतोय अपघाताचे केंद्र ; बस अपघातात 15 जखमी

0
31

देवळा प्रतिनिधी : देवळा नाशिक रस्त्यावर हाॕटेल दुर्गा समोर एस टी बसला झालेल्या अपघातात पंधरा प्रवाशी जखमी झाले. नाशिक जिल्ह्यातील विंचूर प्रकाशा महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. दुर्गा हॉटेल परिसरात हा अपघात आज दुपारच्या सुमारास घडला.

सटाणा आगाराची नाशिक – सटाणा बस क्रमांक एम. एच. ४० एन. – ८८०१ दुर्गा हॉटेल समोर खड्यात आदळली. यादरम्यान, स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला ही बस जाऊन चारीत जाऊन अडकली. या अपघातात पंधरा प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर देवळा ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, तर एस टि महामंडळाकडून जखमींना प्रत्येकी पाचशे रुपयांची तातडीची मदत देण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक बोरसे यांनी दिली,


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here