दिंडोरीत शेतातून 8 क्विंटल ‘अफू’ जप्त : शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

0
113

दिंडोरी प्रतिनिधी : शेतकऱ्याने पिकवलेल्या पिकाला बाजार भाव नसल्याने शेतकरी चुकीच्या मार्गाला जातो की काय अस आढळून येत आहे, दिंडोरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने अफूची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली असून दिंडोरी पोलिसांनी Dindori Police सदर शेतकऱ्यांवर कारवाई करत जवळपास 8 लाखांची अफूची झाडे जप्त केली आहेत. गुप्त माहितीच्या आधारे आज हा प्रकार उघडकीस आला आहे.

नशिक शहरापासून नजीक असलेल्या दिंडोरी तालुक्यातील ठेपणपाडा या गावात अफूची शेती असल्याची गुप्त बातमी दिंडोरी पोलिसांना समजली व त्यातून रविवारी दिंडोरी पोलिसांनी ठेपणपाडा शिवारातील गट नंबर २२ मध्ये विनापरवाना बेकायदा आर्थिक फायदयासाठी अफु या आमली पदार्थाच्या झाडाची लागवड केलेली मिळून आले. सदरील शेतातील सर्व अफू दिंडोरी पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी जप्त केलेले यावेळी गोण्यांमध्ये वेगवेगळया वजनाच्या एकुण ४३ गोण्या हिरवे अफुची झाडे मुळासकट भरण्यात आले. एकूण ८०३ किलो वजनाची ८ लाख किमतीचा अफु दिंडोरी पोलिसांनी जप्त केला. पोलीस बाळकृष्ण पजई यांच्या फिर्यादीवरून अंमली व औषधीद्रव्य मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम १८ प्रमाणे शेतमालक कांतीलाल उर्फ रामचंद्र गोविंद ठेपणे (वय.३८ वर्षे,) रा. ठेपणपाडा, ता. दिंडोरी, याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

दिपक लालसिंग महाले (वय.४२ वर्षे) मुळ रा. दुसाणे बडसाणे, ता. साकी, जि. धुळे, ह.मु.कुश व बिल्डींग रूम नं. ११, आदर्श नगर, राऊ हॉटेलच्या मागे, पेठ रोड, नाशिक. तसेच मोहन वामन दळवी ( वय.३६ वर्षे) मुळ रा. ठेपणपाडा, ता. दिंडोरी, जि. नाशिक, ह.मु. अथर्व रोहाऊस नं. २९ इंद्रप्रस्थनगर, पेठरोड नाशिक.

यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपींना दिंडोरी पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस बाळकृष्ण पजई, एस.पी.धुमाळ आदी दिंडोरी पोलिस करीत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here