द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : आता जीवनावश्यक वस्तू भेटणाऱ्या ठिकाणीही वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याच्या तयारीत महाविकास आघाडी सरकार असल्याचं सांगण्यात येत आहे.
आत्ता पर्यंत महाविकास आघाडी सरकारने अनेक निर्णय घेतले. जे अतिशय आश्चर्य कारक असे आहेत. त्यात तर सरकारचं मद्य प्रेम अधिकच असल्याचं दिसून येत आहे.
महाविकास आघाडी सरकार आता किराणा दुकान, बेकरी, डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये सुद्धा वाईन विक्रीची परवानगी देण्याच्या तयारीत आहे. याबाबतचा अध्यादेश देखील लवकरच काढला जाण्याची शक्यता आहे. अर्थात, वाईन सुद्धा आता त्यांच्या दृष्टीने अत्यावश्यक झाली की काय? असेच म्हणावे लागेल.
कोरोनाच्या शिरकावानंतर सर्व प्रकारची मद्याची दुकानं बंद झाली. त्यामुळे तळीरामांची मोठ्या प्रमाणावर पंचाईत झाली. मद्य अर्थात दारूचा काळा बाजार देखील यामुळे सुरू झाला.
मात्र आता तळीरामांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे. आता किराणा दुकान, बेकरी, डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये सुद्धा वाईन उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे तळीरामांना अजूनच सोपं काम होणार आहे.
याआधी महाविकास आघाडी सरकारने विदेशी मद्यावरील कर कमी करून, त्याचे दर कमी केले. आणि आता या नवीन निर्णयाने तळीरामांना अजूनच सुखद धक्का महाविकास आघाडी सरकारने दिला आहे.
लवकरच याबाबतचा अध्यादेश देखील काढला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
ही बातमी वाचलीत का?
अहमदनगर जिल्ह्याच्या दरेवाडी येथे ग्रामपंचायत पदाधिकारी वर्गातच हाणामारीची घटना घडली.
राजकीय वादंग हा प्रकार तसा काही लोकांसाठी नवीन नाही. टीका टिप्पणी, हमरी तुमरी, आरोप प्रत्यारोप अशा गोष्टी राजकीय वर्तुळात घडतच असतात. हाणामारीची बाब देखील राजकीय गोटात काही नवीन नाही.
अहमदनगर तालुक्याच्या दरेवाडी येथे राजकीय वादातून ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांमध्येच तुफान हाणामारी झाली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचलं. मात्र हाणामारी करणाऱ्यांचं पोट भरलं नसेल की काय, म्हणून ते थेट पोलीस ठाण्याच्या आवारात देखील एकमेकांना भिडले.
मुख्य म्हणजे या वाद घालणाऱ्यांमध्ये, महिला देखील होत्या. ज्यांच्या मुखातून अतिशय घाणेरड्या प्रकारच्या शब्दांचे उच्चार बाहेर पडत होते. या वादात शिवीगाळ करण्यात तर महिला देखील मागे नव्हत्या. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच चिघळलं होतं.
लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचं प्रतिनिधित्व करणारे. आणि लोकांसमोर आदर्श ठेवणं हे यांचं कर्तव्य. मात्र इथे दरेवाडीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी वेगळाच आदर्श लोकांसमोर ठेवला.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
दारू मिळाली पाहिजे शरीराला खुप गरज आहे