द पॉईंट नाऊ : दारू म्हटले की शौकिनांच्या नजरा बार कडे वळता, तुम्ही ऐकले असेल दारू पिणे आरोग्यासाठी घातक (Alcohol Side Effects)आहे. पण पिणारे पितातच घातक आहे या इशाऱ्याकडे खूप कमी लोक लक्ष देतात. दारु पिणाऱ्यांना जर तुम्ही फायदे विचारले तर १० फायदे सांगतील, पण दारुमुळे होणारे नुकसान मात्र दुर्लक्षित करतात.
सध्या एका संशोधना अंतर्गत असा दावा केला आहे की, एक महिना दारु न पिल्यास रोज दारु पिणाऱ्यांच्या आरोग्यामध्ये बदल होतात. हे बदल ऐकून तुम्ही थक्क व्हाल प्रायरी ग्रुपच्या एक्सपर्टने दावा केला आहे की, जर एक महिन्यासाठी (Quit Alcohol for 1 month) दारू पिणे सोडले तर शरीर पूर्ण पणे बदलून जाते.
खुलासा ‘ड्राय जानेवरी’ (Dry January) मोहिमेअंतर्गत करण्यात आला आहे. या मोहिमेनुसार लोकांना जानेवारी महिन्यामध्ये दारु पिऊ नये यासाठी जागरुक केले गेले. यूरोप आणि अमेरिकेमध्ये हे जास्त करुन पाळले जाते.पहिला आठवडा एक्सपर्टनुसार, जर तुम्ही रोज दारु पीत असाल तर पहिल्या आठवड्यात तुम्ही पुन्हा दारु पिण्याची शक्यता आहे. दारू पिण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवणे अवघड आहे. जर कोणी एका आठवड्यामध्ये दारू पीत नाही त्याला जाणवेल की त्याची झोपण्याच्या वेळेत बदल (Sleep Regulate After Quitting Alcohol) झाला आहे. दारु पिण्यामुळे लगेच झोप येते. अशावेळी दारू सोडल्यानंतर एका आठवड्यामध्ये झोप येणे अवघड असते, पण ती गाढ आणि चांगली झोप असेल.
एका आठवड्यामध्ये जास्त हायड्रेटेड (Body Hyderated After Quitting Alcohol) झाल्याचे जाणवेल कारण, वाईनचे ६ ग्लास प्यायल्यास १९-२० ग्लास पाण्याची कमतरता शरीरामध्ये जाणवते. पहिल्या आठवड्यात तुम्ही कमी जंक फूड खाता आणि जेवणामध्ये सुधारणा होईल. दुसरा आठवडादोन आठवडे दारू सोडल्यामुळे तुम्हाला चांगली झोप आणि हायड्रेट राहण्याचा परिणाम दिसून येईल. तुम्हाला उत्साही असल्याचे जाणवेल आणि तुमची स्कीन जी आधी सुजल्यासारखी दिसत होती ती चांगली दिसेल. जर तुम्हाला गॅस किंवा अॅसेडिटीची समस्या असेल तर ती दोन आठवड्यात ठीक होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम