दहीवडचे ग्रामस्थ अंदोलनाच्या पावित्र्यात ; पांगळी नदीवर पुलाची मागणी

0
14

दादाजी हिरे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यातील नॅशनल हायवे क्रमांक 3 ते चिंचवे रामनगर दहीवड वाखारी देवळा या गांवाना जोडणाऱ्या प्र.जि.मा क्र 129 रस्त्यावरील परसूल नदी ( पांगळी नदी वर )पुल ब्रिज होण्याबाबत वांरवार मागणी करूनही परसूल नदीवर पुल होत नसल्याने आज दिं 9-10-2021 रोजी दहिवडी ग्रामस्थांनी पाण्यात उतरून अंदोलनाचा पावित्रा घेतला.

हा रस्ता परीसरातील शेतकर्यांना आपला कृषी माल विकण्यासाठी बाजार समिती चांदवड उमराणे सोईस्कर असून यात प्रशासन व लोक प्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नदीला चार महिने पाणी असल्याने शेतकऱ्यांना व प्रवाशांना खाच खळग्यातुनआपला जिव धोक्यात घालुन निर्धारित रस्तापर्यंत अंनत अडचीनां सामोरे जाऊन पायपीट करावी लागते.

सदर ठिकाणी झालेल्या लहान मोठ्या अपघातात शारिरीक व वित्तहानी अनेकदा झालेली आहे
गेल्या दोन वर्षापासून प्रस्तावित पुल मंजूर असुन आत्तापर्यंत कारवाई का केली नाही असा संतस्त सवाल ग्रामस्थ करीत आहे.

परसूल नदीवर पुला व्हावा हि मागणी जुनी व रास्त शिर असल्याने यात आमदार खासदार जि प सदस्य सां बा विभाग ग्रामस्थांची मागणी गांभीर्याने दखल घेत नसल्याचे गंभीर आरोप ग्रामस्थांनी घेतला.

यावेळी प्रशासनाने दखन न घेतल्यास देवळा प्रहार शेतकरी संघटना व ग्रामस्थ मंगळवार 16 ऑक्टोबर रोजी मा तहसीलदार सो देवळा जुने तहसील पाच कंदील कार्यालय देवळा समोर महाराष्ट्र राज्य पारंपारिक वाघ्या मुरळी पथका समवेत बेमुदत अंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार संघटना देवळा तालुका व ग्रामस्थांनी दिला.

यावेळी सदर बेमुदत उपोषणाचा अर्ज ई मेल द्वारे
मा पंतप्रधान भारत सरकार दिल्लीं क केंद्रीय रस्तेव वाहतुक मंत्री नितीन गडकरी दिल्ली मुख्यमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई आमदार राहुल आहेर चांदवड देवळा मतदार संघ भारतीताई पवार केंद्रीय राज्यमंत्री बच्चू कडू राज्यमंत्री तहसीलदार देवळा सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अधिकारी चांदवड आदींना निवेदन देण्यात आले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here