दहिवड येथे विद्युत ट्रान्सफार्मरवर चढून भोयेगावच्या रहीवास्याचीआत्महत्या

0
43

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गुरुवारी दिनांक ( 11)रोजी रोजी देवळा तालुक्यातील दहिवड येथे शेलदर शिवारातील पुंजाराम साखर देवरे यांच्या शेताजवळील विद्युत ट्रांसफार्मर ग्रुप नंबर 22 वर रात्री आठ वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील सोपान संपत बर्डे (२५) या युवकाने चढत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे .

याबाबत स्थानिक नागरिकांनी पाहिले असता. प्रहारचे संजय दहिवडकर यांना याबाबत कळविले त्यांनी पोलिसांना या घटनेची खबर दिली . घटनास्थळी देवळा पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विक्रांत कचरे इतर पोलिसांसह, विद्युत कर्मचारी पथक हजर झाले.

स्थानिकांच्या मदतीने मृतदेह ट्रांसफार्मर वरून खाली उतरवून दहिवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ॲम्बुलन्सने देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला सदर आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पुढील तपास देवळा पोलिस करीत आहेत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here