दादाजी हिरे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यातील दहिवड येथे वघाऱ्या डोंगर येथे रमेश संतोष देवरे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने
हल्ला करून एक मेंडीचा फडशा पाडला. यामुळे नागरिक मोठ्या दाहशतीत आहेत. जनावरांना देखील सध्या शेतकऱ्यांना बिबट्या पासून सांभाळावे लागत असल्याने सध्या दुहेरी कसरत करावी लागत आहे.
डोंगर व जंगलचा भाग असल्यामुळे बिबट्याचा सतत वावर असल्यामुळे अनेक हिंस्र प्राणी या ठिकाणी फिरताना ग्रामस्थांना दिसतात , बिबट्याने हमला केल्यामुळे पुन्हा मेंढपाळ व्यावसायिकांवर भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी मेंढपाळ व्यवसायिकांनी केेली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम