
देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील सरस्वतीवाडी , माळवाडी परिसरात पूर्ववत रात्रीच्या वेळेत दहा तास वीजपुरवठा करण्यात यावा ,या मागणीचे निवेदन येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे (दि २) रोजी दिले .

निवेदनाचा आशय असा कि ,सरस्वतीवाडी, माळवाडी परिसरात सध्या कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याठिकाणी पूर्वी रात्रीच्या वेळी दहा तास वीजपुरवठा करण्यात येत होता. आता तो आठ तासावर करण्यात आला आहे . तोही सुरळीत नसल्याने पिकांना पाणी वेळेवर पाणी देता येत नसल्याने पिके करपु लागली आहेत .
यामुळे वीज वितरण कंपनीने याची दखल घेऊन , पूर्वी प्रमाणे दहा तास वीजपुरवठा करावा , तसेच कमी दाबाचा वीज पुरवठा होत वीज पंप सुरळीत चालत नाहीत . कमी दाबामुळे ट्रान्सफार्मर जाळण्याचे प्रमाण वाढले असून , या प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे . या ठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकांना वेळेत पाणी देता येत नाही . परिणामी पिके करपू लागल्याने नुकसानीची भीती व्यक्त करण्यात आली आहे . याची वीज वितरण कंपनीने दखल घेऊन पूर्ववत वीज पुरवठा सुरळीत तोही उच्च दाबाने करण्यात यावा ,अशी मागणी करण्यात आली आहे .
निवेदनावर बंडू आहेर ,विजय आहेर, चंद्रकांत आहेर ,पंकज आहेर ,भालचंद्र मेधने ,विलास भामरे ,राजेंद्र आहेर ,विकास आहेर ,प्रदीप आहेर, जगदीश मेधने ,दिनकर आहेर ,धना आहेर आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम