पुणे प्रतिनिधी : दहावी बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला अचानक आग लागल्याने प्रश्नपत्रिका या आगीत संपूर्ण जळून खाक झाल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील पुणे- नाशिक महामार्गावर दहावी बारावीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला चंदनपुरी घाटात मागच्या बाजूने आग लागली.
या आगीमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस अग्निशामक दल दाखल होत आग विझवण्यात आली. आगीत संपूर्ण राख रांगोळी झाली.
ही घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे, घटनेमध्ये जीवित हानी झाली नसली, तरी टेम्पो संपूर्ण जळून खाक झाला असून त्यामधील सर्व दहावी – बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पुणे (Pune) बोर्डाचे शैक्षणिक अधिकारी घटनास्थळी आल्यानंतरच पंचनामा करू अशी माहिती संगमनेर पोलिसांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम