द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राज्यात हिंदू मुस्लिम वाद चव्हाट्यावर आला असून ”मशिदीवरील भोंगे राज्य सरकारनं हटवावे, नाहीतर मनसे कार्यकर्ते ते हटवतील व . त्याविरोधात हनुमान चालीसा पठण केले जाईल, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्कच्या सभेत म्हटलं आहे. त्याचे पडसाद अद्यापही राज्यात उमटत असून दररोज त्यात वाढ होत आहे.
महाराष्ट्रातील विविध भागात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून जालन्यात ही मनसे कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावून पठण केल्याच्या निषेधार्थ मुस्लिम तरुणांकडून जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरे आणि मनसे जिल्हा अध्यक्ष रवी राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा नाही तर आम्ही लाऊडस्पीकरवर ‘हनुमान चालीसा लावू, असा इशारा दिला होता. राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जालना शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या रामभाऊ राऊत चौकात हनुमानाचे 25 फूट उंच पोष्टर लावून जोरदार घोषणाबाजी करत सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावून, कार्यकर्त्यांकडून आरती करण्यात आली.
त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसाच पठण केले होते. यांचा निषेध म्हणून आज मुस्लिम कार्यकर्त्यांनी भोकरदन नाका परिसरात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा अध्यक्ष रवी राऊत व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करत जोरदार घोषबाजी केल्याने तणावनिर्माण झाला होता.
महाराष्ट्रात जर त्यांच्या या वक्तव्यानंतर दंगली भडकल्या तर त्याला जबाबदार राज ठाकरे असतील, असा इशारा ही यावेळी मुस्लिम कार्यकर्त्यांकडून देण्यात आला. मशिदीवरील अनाधिकृत भोंगे काढण्याबाबत पुण्यात मनसे ‘खळखट्याक’ करणार आहेत. पण या दरम्यान दुसरीकडे मुस्लिम समाजाने राज ठाकरे यांचा निषेध केला आहे. या घटना बघता भविष्यात धार्मिकभावना भडकण्याची शक्यता वाढली आहे.
पुण्यातील कोंढवा येथील नुरानी कब्रस्थानचे भूमिपूजन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्या बाबतचा फलक येथे लावण्यात आला आहे. आज या फलकावरील राज ठाकरे यांच्या नावाला स्थानिक लोकांनी काळा रंग लावून राज ठाकरे यांचा निषेध केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम