त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे प्रसिद्ध त्र्यंबकराज वारकरी शिक्षण संस्थेचा वर्धापनदिन सोहळा शनिवार दि 19 मार्च 2022 रोजी भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. या प्रसंगी सायंकाळी 4 ते 6 दरम्यान किर्तन होणार असून सायंकाळी साडेसहा नंतर सत्कार समारंभ आहे तर रात्री 8 नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. हा सोहळा जगद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे.
या सोहळ्याचे आयोजक व त्र्यंबकराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. ह.भ.प. गोविंद महाराज शिरोळे यांनी सर्व पारमार्थिक भाविक भक्तांनी या वर्धापनदिन सोहळ्यास उपस्थिती राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, हा सोहळा सर्व वारकरी भक्तांनसाठी आनंददायी असेल अशी आशा आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम