त्या परदेशी ‘पुष्पा’चा भारताने केला सत्कार

0
29

द पॉईंट नाऊ ब्युरो : टांझानिया येथील सोशल मीडियावरील लोकप्रिय कलाकार किली पॉल याचा टांझानिया येथील भारतीय दूतावासात सत्कार करण्यात आला.

या सत्काराला कारण देखील तसेच आहे. किली पॉल हा मागील बऱ्याच काळापासून लोकप्रिय भारतीय गाण्यांवर लिपसिंक करून सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून टाकत आहे. या कारणाने तो भारतीयांमध्येही चांगलाच लोकप्रिय झाला आहे. याच कारणास्तव टांझानिया येथील भारतीय उच्चायुक्त बिनाया प्रधान यांच्याद्वारे किली पॉल याचा भारतीय दूतावासात सत्कार करण्यात आला. याबाबत बिनाया प्रधान यांनी ट्विट करत माहिती दिली.

किली पॉल हा इन्स्टाग्रामवर भारतीय गाण्यांवर वेगवेगळ्या व्हिडीओ बनवून टाकत असतो. यामुळे तो भारतात देखील चांगलाच लोकप्रिय झाला आहे. यास्तव त्याचा सत्कार करण्यात आला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here