तिसगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

0
120

स्वप्निलअहिरे, प्रतिनिधी : तालुक्यातील तिसगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. सोसायटीच्या ” चेअरमन ” पदी चांदवड तालुक्यातील प्रगतिशील कांदा व्यापारी श्री दशरथ विठ्ठल गांगुर्डे यांची व “व्हाईस चेअरमन पदी ” ह.भ.प.श्री धोंडिबा रामभाऊ गांगुर्डे यांची बिनविरोध करण्यात आली झाली.व संचालक पदी श्री मारुती नामदेव गांगुर्डे,राजेंद्र अंबादास गांगुर्डे,यशोदीप विजय घमंडी,भारत मोतीराम ढगे,निवृत्ती विष्णू माळी,अनुसया निवृत्ती गांगुर्डे, बबनबाई भिकाजी गांगुर्डे,गणेशगिर शंकरगिर गोसावी,गोकुळ नाना गांगुर्डे,जनार्दन सावळीराम गांगुर्डे,गंगाधर दादा गांगुर्डे,यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नुकतीच संस्थेची पंचवार्षिक संपूर्ण निवडणूक बिनविरोध पार पडली.

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी चांदवड येथे सहाय्यक निबंधक कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली.त्यामध्ये अध्यक्ष पदासाठी प्रसिद्ध कांदा व्यापारी श्री दशरथ विठ्ठल गांगुर्डे व उपाध्यक्ष पदासाठी प्रगतिशील शेतकरी श्री.धोंडिबा रामभाऊ गांगुर्डे यांचा प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री विजय कृष्णाजी घमंडी,यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली व शिवाजी नामदेव निकम,तंटामुक्ती अध्यक्ष अशोक रंगनाथ गांगुर्डे, माजी सरपंचशांताराम विठ्ठल गांगुर्डे, भिकाजी केदु गांगुर्डे, ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे, निवृत्ती गोविंदा गांगुर्डे, दौलत बच्छाव, केशव खैरे, संजय गांगुर्डे, मा.सरपंच कैलास खैरे, मयूर गोसावी, ज्ञानेश्वर गांगुर्डे, विजय गांगुर्डे, संतोष गांगुर्डे इ.उपस्थित राहून परिश्रम घेतले.निवडणूक निर्णय अधिकारी श्री किशोर भालेराव व संस्थेचे सचिव म्हणून श्री बाळासाहेब गांगुर्डे यांनी काम पाहिले. सर्व नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे संस्थेचे सभासद, ग्रामस्थ, व्यापारी व वारकरी संप्रदायाच्या वतीने व परिसरातुन अभिनंदन होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here