ताहाराबाद येथे अवैध वाळू वाहतुकीतुन सत्ताधारी आणि ग्रामसेवकच खाताय मलिदा?

0
50

द पॉईंट नाऊ – ताहाराबाद (रोहित गुरव) ; बागलाणच्या ताहाराबाद येथे अवैध रित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून देण्यात आलाय.

एकीकडे महसूल विभाग आणि पोलीस कारवाई करत असल्याचे दाखवते खरे. मात्र प्रत्यक्षात वाळू तस्करांवर रंगेहाथ पकडण्याचं काम दुसऱ्यांना करावं लागतं.

ताहाराबाद येथे शिवसेना तालुका प्रमुख सुभाष नंदन यांनी आपल्या सहकऱ्यां सह मिळून ताहाराबाद येथे एक अवैध रित्या वाळूची तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडून दिलाय.

आणि धक्कादायक बाब म्हणजे, हा ट्रॅक्टर ताहाराबाद ग्रामपंचायतीचाच आहे.

म्हणजे ‘कुंपणच शेत खातंय’ असं म्हणायचं का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

मागील काळात तालुका महसूल विभागाकडून अवैध रित्या वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात येऊन, 1 लाखांहून अधिक चा दंड वसूल करण्यात आला होता.

मात्र आता प्रशासनाचाच एक भाग असलेल्या, ताहाराबाद इथल्या ग्रामपंचायतिचेच वाहन अवैध कामांसाठी वापरल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जातेय.

आधीच ताहाराबाद ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार प्रकरण चव्हाट्यावर आलेले आहे. ज्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसेना तालुका प्रमुख सुभाष नंदन यांनी ताहाराबाद ग्रामपंचायत भ्रष्टाचार बाबत आवाज उठवत, आत्मदहनाचा इशारा दिला होता. ज्यावर त्वरित ताहाराबाद इथल्या ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.

आता हे नवीन प्रकरण उघडकीस आले आहे. ज्यात ताहाराबाद ग्रामपंचायतचेच वाहन अवैध कामांसाठी वापरण्यात आल्याचे समोर आले आहे.

त्यात हे वाहन शिवसेना तालुका प्रमुख सुभाष नंदन यांनीच पकडून दिले आहे.

त्यामुळे ताहाराबाद ग्रामपंचायत च्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

कोणाच्या परवानगीने ही अवैध वाळू तस्करी ग्रामपंचायत च्या वाहनाने करण्याचा प्रयत्न झाला? असा सवाल सुभाष नंदन यांनी उपस्थित केला आहे.

आणि मुळात ही अवैध वाळू वाहतूक होतेच कशी? आणि याला हातभार कोणाचा? यावर वरदहस्त कोणाचा? असे गहन प्रश्न निर्माण होत आहेत.

ताहाराबाद ग्रामपंचायत चे सत्ताधारी आणि ग्राम सेवक हे संगनमताने ही अवैध वाळू वाहतूक करत आहेत. आणि त्यातून मिळत असलेला मलिदा खाताय. असा आरोप शिवसेना तालुका प्रमुख सुभाष नंदन यांनी केला आहे.

आता या प्रकरणावर बागलाण चे तहसीलदार जिंतेंद्र इंगळे काय कारवाई करणार? असा प्रश्न निर्माण होतोय.

ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार प्रकरणाला अजून एक पाठबळ या प्रकारामुळे मिळालं आहे.

आता यावर काय निर्णय होणार? ताहाराबाद ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण अजून कोणते वळण घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here