ताहाराबाद – भाजपचे डॉ. अनिल बोंडे यांवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

0
49

रोहित गुरव

द पॉईंट नाऊ (ताहाराबाद) : काँग्रेस नेते नाना पटोले यांना पंजे छाटण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी ताहाराबाद येथील काँग्रेस पदाधिकारी वर्गातर्फे भाजप नेते तथा माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथील गावगुंड मोदी बाबत केलेल्या वक्त्यव्याचा विपर्यास करून देशाचे पंतप्रधान यांचा अपमान महाराष्ट्र भाजपाने केला व काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हे दाखल केले. याप्रकरणी, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते, जि. प. सदस्या रेखा यशवंत पवार यांचे पति माजी उपसरपंच यशवंत पवार ग्रामपंचायत सदस्य डॉ. नितिन पवार, युवा नेते राजेंद्र साळवे, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस महासचिव दिपक कांकरिया, नाभिक समाजाचे उपाध्यक्ष योगेश घांगुडे, अमोल ठाकरे, मुन्ना पवार, भूषण सोनवणे, किशोर पाटील व इतर कार्यकर्ते यांनी ताहाराबाद येथील पोलीस स्टेशनचे कर्मचारी भोये यांच्याकडे ही तक्रार दाखल केली.

19 जानेवारी रोजी पंतप्रधान यांचा अपमान केल्या प्रकरणी व नाना पटोले यांचा पंजा छाटन्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपाचे नेते माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे व अन्य पदाधिकारी यांना अटक करून कलम 506 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी काँग्रेस पदाधिकारी वर्गातर्फे करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here