ताहाराबाद – पंतप्रधान सुरक्षाप्रश्नी पंजाब येथील घटनेचा भाजपतर्फे निषेध

0
45

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (ताहाराबाद) : पंजाब येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या दरम्यान त्यांचा ताफा अडवून त्यांच्या सुरक्षेत अडचण निर्माण केल्याबद्दल ताहाराबाद येथे भाजपतर्फे पंजाब सरकारचा निषेध करण्यात आला.

ताहाराबाद चौफुली येथे भाजप कार्यकर्त्यांनी फलकबाजी करत या घटनेचा निषेध व्यक्त केला.
पंजाब येथे पंतप्रधान मोदी हे गेले असता आंदोलक शेतकरी वर्ग रस्त्यात आल्याने, पंतप्रधानांचा ताफा एकाच जागी अडकला होता. यामुळे पंजाब सरकार आणि पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले.

ताहाराबाद येथे निषेध करतेवेळी कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर चे संचालक संजय भामरे, शांताराम निकम, भाजपचे ज्येष्ठ नेते नाना भामरे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश महाजन, भाजप तालुका उपाध्यक्ष रवींद्र मानकर, शहर अध्यक्ष मुकेश साळवे, अपंग आघाडी तालुका अध्यक्ष दत्तात्रेय गवांदे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश साळवे, सागर नहीरे, मुकेश गवळी, विशाल ढोमणे आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here