ताहराबादच्या विद्यार्थ्यांची जलसेवा; 12 वीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम.

0
13

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; पाणी (Water) ही प्रत्येक सजीवाच्या आयुष्यातली सर्वाधिक आवश्यक बाब आहे. सजीवाला एक वेळ अन्न (Food) मिळाले नाही तरी चालेल. परंतु कोणताही सजीव पाण्यावाचून जगू शकत नाही. म्हणूनच कोणाचीही तहान भागविण्या इतक मोठं पुण्य कोणतही नाही.

हाच पुंण्याचा मार्ग निवडला बागलाण (Baghlan) तालुक्यातल्या ताहराबाद (Taharabad) येथील सिद्धी इंग्लिश मेडिअम स्कूल (Siddhi English Medium School) च्या विद्यार्थ्यांनी (Students).

सिद्धी इंग्लिश मेडिअम स्कूल च्या काही विद्यार्थ्यांनी मिळून, ताहराबाद येथील बस स्थानकात (Bus Stop) येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी (People) मोफत पाण्याची (Free Water) सोय करुन दिली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या कोणाही तहानलेल्याला या विद्यार्थ्यांच्या या सहयोगाने आपली तहान भागवता येईल.

Humanity Helping Hand Foundation च्या मदतीने, प्रवासी आणि गावातील नागरिकांसाठी ही मोफत जलसेवा या विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे. त्यांच्या या सेवेचे उद्घाटन ताहराबाद बस स्थानकाचे डेपो मॅनेजर यांच्या हस्ते करण्यात आले.

करण कांकरिया, भूषण गांगुर्डे, प्रथम साळवे, रोहित गांगुर्डे, जयेश मेहता, नयन गांगुर्डे, हर्षवर्धन बच्छाव अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत.
ज्या वयात मुलं केवळ शिक्षण, खेळ अशा गोष्टींकडे लक्ष देतात, त्या वयात या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे जलदानाचे कार्य सुरू केले आहे. आणि हा सर्वांसाठीच एक आदर्श आहे.

जलदान करण्या इतपत श्रेष्ठ दान दुसरे कोणतेही नाही. आणि असेच हे दान करून या सर्व विद्यार्थ्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
शालेय जीवनात हे सारेच विद्यार्थी आपल्या गुरुजनांच्या कौतुकास तर पात्र ठरतातच. परंतु, अशा प्रकारे कार्य करून ते नागरिकांच्या कौतुकास देखील पात्र ठरत आहेत. ताहराबाद येथील येणाऱ्या जाणाऱ्यांची गरज ओळखून या विद्यार्थ्यांनी हा अनोखा उपक्रम सुरू करत सर्वांनाच एक आदर्श घालून दिला आहे.

सध्याच्या या जगात अशा प्रकारे उपक्रम सुरू करणं आणि तो ही शालेय विद्यार्थ्यां द्वारे ही खरच खूप मोठी कौतुकास्पद बाब ठरते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here