देवळा प्रतिनिधी : देवळा तालुक्यात चोरांचा सुळसुळाट वाढला असून आज शहरात पहिल्यांदाच निम गल्लीत महिला अधिकारी मुख्य पर्यवेक्षक सुनीता महेंद्र थोरात यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून नेली आहे. याबाबत देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे , एका बाजूला साखळी चोर , दुचाकी चोर ते दुसऱ्या बाजूला अवैध धंद्यांचा सुळसुळाट यामुळे देवळा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. पोलीस निरीक्षक सन्मानीय लांडगे यांनी पदभार घेतल्या नंतर शहरात शिस्त हा शब्द अंधश्रद्धा झाला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
तालुक्यात दुचाकी चोरांचा सुळसुळाट वाढला आहे त्यानंतर आज चैन स्नेकिंग असे प्रकार वाढत गेल्यास तालुक्यातील सुरक्षितता चव्हाट्यावर येणार आहे. भविष्यात चोरट्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन काय पाऊले उचलते याकडे लक्ष लागून आहे, निमगल्ली सारख्या वर्दळीच्या ठिकाणी दिवसा ढवळ्या घटना घडत असतील तर ही बाब तालुक्यासाठी चिंताजनक आहे.
पोलीस निरीक्षक लांडगे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर कायदा सुव्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा असतांना अपेक्षापूर्ती ऐवजी अपेक्षाभंग झाल्याने नागरिकांनी मात्र संताप व्यक्त केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम