तालिबानला हवेत भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ; पाकिस्तानचा तिळपापड

0
12

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : तालिबान (Taliban) ही एक दहशतवादी संघटना आहे. या संघटनेने अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये सत्ता हस्तगत केली आहे. तेव्हापासून अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. याच तालिबानला (Taliban) हाताशी धरून भारताला (India) शह देण्याचा प्रयत्न पाकिस्तान (Pakistan) मधील काही दहशतवादी (Terrorist) गट करू पाहत आहेत. या अनुषंगाने तालिबानच्या (Taliban) प्रमुख नेत्याची भेट देखील पाकिस्तान (Pakistan) मधील दहशतवादी गटाद्वारे घेण्यात आली होती. मात्र तालिबान (Taliban) द्वारे कोणत्याही प्रकारचे ठोस उत्तर यासंदर्भात न मिळाल्याने पाकिस्तानी (Pakistan) दहशतवादी गटाचा हिरमोड झाला. त्या अनुषंगाने वारंवार प्रयत्न देखील चालू होते.

मात्र आता थेट तालिबाननेच भारतासमोर (India) मैत्रीचा प्रस्ताव ठेवल्याचं बोललं जातंय. मध्यंतरी तालिबान (Taliban) द्वारे भारतास (India) देखील धमकी वजा इशारा देण्यात आला होता. भारताने अफगाणिस्तानच्या अंतर्गत वादात हस्तक्षेप केल्यास भारताला (India) त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा तालिबान (Taliban) द्वारे दिला गेला होता. मात्र आता तालिबाननेच भारतासमोर (India) मैत्रीचा प्रस्ताव ठेवला आहे. तालिबानचा (Taliban) प्रमुख नेता मोहम्मद अब्बास स्टेनिकजाई याने, भारतासोबत (India) आम्हाला चांगले संबंध हवे असल्याचे म्हटले आहे. यामुळे पाकिस्तानच्या (Pakistan) भारतविरोधी गटात असंतोष पसरल्याचं बोललं जातंय.

भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) यांच्यातील वाद हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही. आणि अफगाणिस्तानचा (Afghanistan) वापर आम्ही कोणत्याही प्रकारे भारत – पाकिस्तानच्या अंतर्गत वादात करू देणार नसल्याचं तालिबानने (Taliban) स्पष्ट केले आहे.

एका बाजूला तालिबान द्वारे भारतासोबतचा (India) व्यापार थांबवला गेला असतांना, तालिबानद्वारे स्वतःच भारताशी मैत्रीचा (Friendship) प्रस्ताव एक प्रकारे पुढे आला आहे.
तालिबानने अफगाणिस्तान मध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर जगभरातून (World) अफगाणिस्तानचा निधी रोखण्यात आला आहे. अमेरिकेतील (USA) अफगाणिस्तानचा पैसा गोठवण्यात आला आहे. तर अफगाणिस्तानचा (Afghanistan) विकास निधी देखील रोखण्यात आला आहे. त्यामुळे तालिबानची एका प्रकारे आर्थिक संकटे वाढली आहेत.

मात्र आता तालिबानद्वारे लवकरच अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये सरकार स्थापन करण्यात येऊन व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे तालिबान आता सर्वांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करू पाहत आहे.
तालिबानच्या या मैत्रीपूर्ण वक्तव्याने भारताद्वारे (India) काय उत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here