मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बाबासाहेबांच्या विचारांची आठवण ट्विटरच्या माध्यमातून करून दिली. फडणवीस यांनी एकापाठोपाठ १४ ट्विट सोबत पवारांच्या जुन्या वक्तव्यांच्या लिंक्स जोडून पवारांवर जोरदार प्रहार केला.
इशरत जँहा, १९९३ स्फोट, सच्चर कमिटी तसेच काश्मीर फाईल्स विषयी पवारांनी घेतलेल्या भूमिकांचा फडणवीसांनी समाचार घेतला आहे. एका ट्विटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम ३७० ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून घेताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुस्लीमांच्या अनुनयाच्या राजकारणावरून शरद पवार यांच्या मागील काळातील काही भूमिकांचे स्मरण करून देत त्यांनी पवारांवर निशाना साधला आहे.
काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून अलिकडेच शरद पवार यांनी केलेल्या विधानांचाही समाचार फडणवीसांनी घेतला आहे. तसेच नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या विधानाचेही फडणवीसांनी स्मरण करुन देत पवारांवर निशाणा साधला.
फडणवीस यांनी २०१२ मध्ये राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना मुंबईतील आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी लढाई दाखविली गेली याबद्दलच्या बातमी लिंक पोस्ट करत टीका केलीय. तसेच आघाडी सरकारने त्यावेळी रझा अकादमीवर कारवाई केली नाही, याचाही उल्लेख फडणवीसांनी केलाय. मुंबई बॉम्बस्फोटानंतर 13 वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्याचे काम शरद पवार यांनी केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम