द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी अभिनेता शारुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं होत. मात्र आता आर्यनच्या व्हाट्सअँप संदेशात काहीच आक्षेपार्ह नसल्याचेही न्यायालयाने स्प्ष्ट केले.
आर्यन आणि अन्य दोघांना नायमूर्ती नितीन सांब्रे यांनी १४ अटी घालून २९ ऑक्टोबरला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आर्यनची आर्थरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली होती. आर्यन आणि अन्य दोन आरोपीना जामीन मंजूर करण्याचा न्यायमूर्ती सांब्रे यांच्या तपशीलावर आदेशाची प्रत शनिवारी उपलब्द झाली.
या षडयंत्रावरून आर्यन आणि अन्य दोनी आरोपीविरोधात कोणताही अमली पदार्थाचे जे पुरावे सादर करण्यात आले या वरून कोणताही गुन्हा केल्याच समोर आले नाही उलट आतपर्यंत तपासातून आर्यन आणि अरबाज मर्चंट यांनी मुनमून धामेचाबरोबर नव्हे तर स्वतंत्र पणे प्रवास केल्याचे तसेच त्यांची तिच्याशी भेट झाली नसल्याचे पुढे आल्याचे नायमूर्ती सांब्रे यांनी आपल्या १४ पानी आदेशात म्हंटल आहे.
त्याचप्रमाणे या आरोपीना षडयंत्राचा भाग म्हणून व्यावसायिक प्रमाणात अमली पदार्थ बाळगून अमली पदार्थ प्रतिबंधक कायदयाअंतर्गत हेतुतः गुन्हा केल्याचे मानले जावे हे एनसीबीचे म्हणणे मान्य करण्यासही न्यायालयाने नकार दिला.
* क्रूझ वरील नेमका प्रवास की षडयंत्र :
आर्यन काढून कोणतेही अमली पदार्थ भेटले नाही परंतु एनसीबी त्यांच्यावर कट रचल्याचा आरोप ठेऊ शकते का, हे तपासणे आवश्यक आहे त्यासाठी बेकायदा कृत्य पुरावा आहे का हे पाहावे लागेल.
त्याचा विचार करता आरोपी केवळ क्रूजवर प्रवास करत होते याचा अर्थ त्यांनी बेकायदा गुन्हा करण्याच्या हेतूने कट रचला असाही होत नाही. तसेच एनसीबीचे म्हणणे मान्य केले तरी त्यासाठी आरोपीना एक वर्षाहून अधिक काळ साठी शिक्षा होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम