डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन आता ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिन’

0
35

द पॉईंट नाऊ ब्युरो : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन अर्थात 7 नोव्हेंबर हा आता राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ गावी भेट देत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. याप्रसंगी कोविंद यांनी याबाबत घोषणा केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे रत्नागिरीत स्वागत करण्यात आले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी अर्थात रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबवडे गावी भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांना असलेली शिक्षणाची ओढ आणि निष्ठा यांचे स्मरण करण्यासाठी आता त्यांचा शाळा प्रवेश दिन अर्थात 7 नोव्हेंबर हा आता ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जाईल.

भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका वेगळ्या वातावरणात, विरोध होत असताना देखील निव्वळ आपल्या ओढीच्या बळावर आपले शिक्षण पूर्ण केले. पुढे ते बॅरिस्टर झाले. संपूर्ण देशाची राज्यघटना आंबेडकरांनी लिहिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या या विशेष घोषणेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हे विशेष अभिवादनच असेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here