देवळा प्रतिनिधी : तालुक्यात सोसायटी निवडणुका जोमात असून शेतकऱ्यांशी जोडलेल्या या सोसायटीत सत्ता स्थापनेसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी म्हणून ग्रामीण भागात सोसायटीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. जवळपास नशिक जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक गावात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.
तालु्यातील भऊर हे गाव राजकीय दृष्ट्या तगडे असून तालुक्यातील घडामोडींचे प्रमुख केंद्र म्हणून पाहिले जाते याच गावातील डॉ.जे.डी.पवार सोसायटीची निवडणूक बिनविरोध होत चेअरमनपदी प्रगतशील शेतकरी दीपक पंडित पवार यांची तर व व्हाईस चेअरमन पदी प्रविण जिभाऊ पवार या दोन्ही युवा शेतकऱ्यांची निवड झाल्याने गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून भविष्यात शेतकऱ्यांसाठी चांगले काम करण्याची संधी या जोडीला मिळाली आहे.
या निवडीनंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच अधिकारी वर्गाने अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शभेच्छा दिल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम