स्वप्नील अहिरे
सटाणा प्रतिनिधी : बागलाण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयातर्फे दिनदर्शिकेचे उद्घाटन बागलानचे आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाची दिनदर्शिका ही खरोखरच स्तुती योग्य आहे. या दिनदर्शिकेमध्ये फक्त तारखा नसून बागलाण तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशा अधिकाऱ्यांचा जीवन परिचय त्यामध्ये समाविष्ट केला आहे. त्यामुळे ही दिनदर्शिका नसून यशस्वी जीवनाकडे वाटचाल करणारा पथदर्शक आहे असे नमूद केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांनीही आपल्या भाषणात वाचन संस्कृती जोपासणेचे कार्य या वाचनालयाकडून चांगल्या रीतीने पार पाडले जात आहे. अशीच यशस्वी वाटचाल वाचनालयाने चालू ठेवावी.
याप्रसंगी प्रकाशन सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे पुस्तक व एक झाड देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना पोपटराव बच्छाव यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे अनेक उपक्रम करण्याचा मानस वाचनालयाच्या वतीने करण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी माजी नगरसेवक काका सोनवणे, दिलीप सोनवणे, दीपक पाकळे,वाचनालयाचे अध्यक्ष किरण बच्छाव ,योगेश ड्रायव्हर, योगेश पवार, घनश्याम निकम, राकेश बच्छाव इत्यादी हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भास्कर सोनवणे यांनी तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किरण पोपटराव बच्छाव यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम