डॉक्टर म्हणजे कलियुगातील देवच…..

0
36

स्वप्निल अहिरे,
आराई प्रतिनिधी : एका मोलमजुरी करणाऱ्या असहाय, दुर्बल महिलेची अशक्य असलेली गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून त्या महिलेला जिवदान देणारी घटना सटाणा येथिल वात्सल्य रुग्णालयात घडली.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि तालुक्यातील कऱ्हे येथिल प्रगतीशील शेतकरी नितीन नवलसिंग पवार यांच्याकडे धकुबाई रामदास पवार नावाची महिला मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होती. या महिलेस मासिक पाळीच्या वेळेस अति प्रमाणात रक्त जात होते. त्या मुळे त्या महिलेच्या शरीरात रक्ताचे प्रमाण अतिशय कमी होते त्यामुळे त्या महिलेची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती.

सदरच्या महिलेस पवार यांनी सटाणा येथिल वात्सल्य रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल केले होते. डॉ. राहुल सोनवणे यांनी त्या महिलेला तपासले असता त्या महिलेचा पोटात मोठ्या प्रमाणात गाठी असल्याचे निदर्शनास आले व त्यातच तिच्या शरीरात रक्ताचे प्रमाणच खूपच कमी असल्याने तिच्यावर विनाटाकेची शस्त्रक्रिया करावी लागेल असा सल्ला दिला व सटाणा येथेच नासिक येथिल सर्जन डॉ. दिनेश बागुल यांना बोलवण्यात आले होते.

या वेळी डॉ राहुल सोनवणे, डॉ. सुश्मिता सोनवणे, डॉ. देविदास शिवदे तसेच काकासाहेब पवार, धिरज झावरे यांनी त्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तीला जिवदान दिले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here