द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यातील वाखारी गटाच्या सदस्य नूतन आहेर यांना नुकतीच अहमदाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात ‘डॉक्टरेट’ ही पदवी प्रदान करण्यात आली. ‘नेल्सन मंडेला’ विद्यापीठातर्फे ही पदवी देण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक प्रल्हाद मोदी सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या हस्ते नूतन आहेर यांना सामाजिक ,राजकिय, प्रशासन व ग्रामविकास क्षेत्रातील कामगिरी बद्दल ही पदवी प्रदान केली.
डॉक्टरेट पदवी मिळाली या आनंदात सर्व तालुका वासीय असल्याने त्यांचा नागरी सत्कार ठेवण्यात आला आहे.
या नागरी समितीत विविध गावातील प्रतिनिधी घेण्यात आले आहेत. पुढीलप्रमाणे अध्यक्ष- दिलीप (मास्तर)आहेर, उप अध्यक्ष- भाऊसाहेब आनंदा आहेर, सदस्य साहेबराव पवार, गंगाधर भदाने, दशरथ पुरकर, शिवाजी मोरे, विलास माळी, महेंद्र देवरे, प्रताप आहेर, धनाजी आहेर, पिंटू भालेराव, भाऊसाहेब देवरे, संदिप पवार, निंबा निकम, बळिराम वाघ, भास्कर माळी, ठमन बापू, माणिक शिंदे, नामदेव शिंदे, प्रदिप सोनवणे, निलेश गुंजाळ, सतिश गांगुर्डे, नीकेश जाधव, रमेश आहिरे, सदाशिव शिंदे, बापू चींचवेकर, अशोक बच्छाव.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम