द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; डिसेंबर (December) महिन्यात कोरोनाची (Corona) तिसरी लाट (Third Wave) येण्याचा इशारा आरोग्य मंत्री (Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिला आहे.
कोरोनाच्या दोन लाटांनी देश भरात हाहाकार माजवला होता. ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला.
त्यानंतर आत्ता कुठे परिस्थिती (Conditions) पूर्वपदावर येऊ लागली होती.
मात्र आता पुन्हा डिसेंबर (December) महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलाय. मात्र यात नागरिकांनी (People) घाबरून जाऊ नये, असे ते म्हटले आहेत.
डिसेंबर (December) महिन्यात (Month) कोरोनाची (Corona) तिसरी लाट येईल. मात्र या लाटेची (Wave) तीव्रता कमी असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
तरी देखील नागरिकांनी (People) काळजी (Care) घ्यावी, असे आवाहन राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave) मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटे बाबत इशारा देण्यात आला होता.
अनेक तज्ज्ञ लोकांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवत, सर्वांना जागरूक राहण्याच्या सूचना केल्या होत्या.
मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटे ऐवजी त्याचा प्रकोप कमी कमी होऊ लागला. त्यामुळे राज्य (State) भरात सारी परिस्थिती आत्ता कुठे पूर्व पदावर येऊ लागली होती.
राज्य भरात आता सारे काही सुरू होऊ लागले होते. सारे काही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले.
परंतु, आता आरोग्य मंत्र्यांनीच (Health Minister) कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटे बाबत भाष्य केले. आणि ते ही डिसेंबर महिन्यात.
डिसेंबर (December) महिना तोंडावर येऊन ठेपलाय. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या या इशाऱ्याने काहीशी चलबिचल सुरू झाली आहे.
सध्या जगाच्या (World) वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.
अनेक देशांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाचा उदय झालेल्या चीन (China) मध्ये तर परिस्थिती अधिक बिकट आहे.
त्यामुळे आता अजून पुढे काय वाढून ठेवले आहे? या बाबत काहीही सांगता येऊ शकत नाही.
आता येणाऱ्या डिसेंबर महिन्यात नेमकी काय आणि कशी परिस्थिती राहते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
डिसेंबर महिन्यात तिसरी लाट आलीच, तर जन जीवनावर काय आणि कसा परिणाम होणार? याबाबत चिंता व्यक्त केली जाते आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
तिसरी लाट वगैरे काही नाही…आली तरी तीव्रता कमी असेल.भारतात बऱ्यापैकी लोकसंख्याला कोरोना झालाय आणि लसीकरण 100 कोटीच्या वर झालंय. आता धोका फक्त लसीकरण न झालेले लोक,वयोवृद्ध आणि 18 वर्षाखालील लोक आहेत.कोरोनाने होणारे मृत्यू कमी असून secondery bacterial infection,fungal infection ने मृत्यू होत आहेत.लसीकरण फक्त मृत्यूचा धोका कमी करते.युरोपात तसेच रशियात लसीकरण न झाल्याने तिथे outbreak झालाय.