टिचर्स सहकारी पतसंस्था मर्यादीत नाशिक हि पतसंस्था बॅंको ब्लु रिबन पुरस्काराने सन्मानित

0
43

प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सहकार क्षेत्राला बळकटी देणाऱ्या सहकारी पतसंस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने बँको कोल्हापूर व गॅलेक्शी इनमा, पुणे यांच्या वतीने सहकारी पतसंस्थांसाठी बँको अडव्हानटेज सहकार परिषद 2021 व बँको ब्लु रिबन सोहळा समारंभ मोठ्या उत्साहात सायलेंट शोअर रिसॉर्ट, म्हैसूर ( कर्नाटक), येथे दिनांक 2 ते 4 सप्टेंबर 2021 रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्यातील चिकोडी चे खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते पतसंस्थेला सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी अविनाश शिंत्रे – गुंडाले तसेच अशोक नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विविध विषयावर सहकार व तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार वक्तींनी मार्गदर्शन केले. आपल्या पतसंस्थेसाठी देण्यात आलेला पुरस्कार हा 50 ते 75 कोटी ठेवी मधील प्रथम पुरस्कार आहे. त्यामुळे आपल्या पतसंस्थेसाठी हा मानाचा पुरस्कार असून त्यामुळे आपल्याला अधिक चांगले कामकाज करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. आपल्या पतसंस्थेची कर्ज मर्यादा रु.2500000/- वरून रु.5000000/- पर्यंत वाढविली आहे, आकस्मित कर्ज मर्यादा रु.50000/- वरून रु.75000/- करण्यात आलेली आहे. कर्जावरील व्याजदर व ठेवींवरील व्याजदर 7% असून ही महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था असेल की तिचा ठेवींवरील व कर्जावरील व्याजदर हा सारखाच आहे. सभासदाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याची संपूर्ण कर्जमाफी केली जाते.

बिगर कर्जदार सभासदांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु.50000/- ऐवजी रुपये 75000/- हजार पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. सेवानिवृत्त सभासदांचा यथोचित सत्कार करून रु.10000/- मानधन देण्यात येते. प्रत्येक सभासदांचा अपघात विमा प्रत्येकी रु.255/- वार्षिक वर्गणी भरून रु.250000/- लाखाचा अपघाती विमा घेतलेला आहे. एखादया सेवकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचा वारसास रु.2500000/- लाखाची आर्थिक मदत दिली जाते.

कर्जावरील व ठेवीवरील व्याजदर समान असूनही सोसायटीस रुपये 2,36,71,894/- इतका विक्रमी नफा झालेला आहे. पतसंस्थेने सभासदांच्या सोयीसाठी बँक ऑफ महाराष्ट्र व आयडीबीआय बँकेमध्ये नवीन खाते सुरू केल्याने सभासदांचे कमिशन व वेळेची बचत झाली आहे. पतसंस्थेचे कामकाज व सभासदांच्या स्वतःच्या खात्याची अपडेट माहिती मिळावी म्हणून पतसंस्थेतर्फे मोबाईल ॲप सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी पतसंस्थेच्या भागधारक सभासदांना 8.25% लाभांश लाभांशाचे वाटप करण्यात आले.

हा पुरस्कार स्विकारणेसाठी पतसंस्थेचे माजी चेअरमन प्रा. राजेंद्र धनवटे, विद्यमान मानद सचिव श्री. अशोकराव बाजारे , संचालक प्रा.यशवंत शिरसाठ व प्रा. संपत कदम उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मविप्र संस्थेच्या सरचिटणीस व पतसंस्थेच्या पदसिद्ध सदस्या आदरणीय निलिमाताई पवार तसेच मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे सभापती श्री. माणिकराव बोरस्ते चिटणीस डॉ.सुनील ढिकले व उपसभापती श्री.राघो नाना अहिरे संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. एस.के.शिंदे, डॉ. डी. डी.काजळे यांनी पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक व सर्व सभासदांचे अभिनंदन केले.

हा पुरस्कार मिळण्यासाठी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here