टाकेद येथे महिला बचत गट मोफत प्रशिक्षण मार्गदर्शन शिबीर संपन्न

0
34

सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद येथे सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतने आयोजित केलेले महिला बचत गट मोफत प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर बहुसंख्य महिलांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बचत गटाचे प्रशिक्षक व मार्गदर्शक दीपक भांगरे, स्वप्नील इंगळे, उमेद च्या जया बदादे हे तर प्रमुख उपस्थिती म्हणून इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी हे होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ ताराबाई रतन बांबळे होत्या तर व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती तालुकाध्यक्षा कु रुख्मिनीताई जोशी, ग्रामपंचायत सदस्या लता लहामटे, नंदाबाई शिंदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी भामरे, प्राध्यापक निलेश गायकवाड होते.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी गावातील सर्व उपस्थित महिलांना प्रमुख मान्यवरांचा परिचय करून देत सर्वच बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार कसा उपलब्ध करून देता येईल,प्रत्येक समाज घटकातील दलित,पीडित,विधवा,निराधार,
परितक्त्या ,वंचित महिलांना जिल्हा उद्योग केंद्राकडून, आदिवासी विकास भवन, पंचायत समिती, जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागाकडून रोजगारासाठी व्यवसायासाठी विविध योजना राबवून प्रत्येक महिला बघिणी आत्मनिर्भर कशी करता येईल.व बचत गटांमार्फत कोण कोणते व कसे काय काय व्यवसाय करता येतात याचे मार्गदर्शन केले.

यानंतर प्रमुख मार्गदर्शन दीपक भांगरे यांनी सर्व महिलांशी अत्यंत मनमोकळे मनसोक्त खेळेमेळी वातावरण तयार करत बचत गट कसा स्थापन करावा,बचत गटांमार्फत कोणकोणत्या आर्थिक वृद्धिंगत व्यवसायाच्या संधी, सुविधा, रोजगार, आत्मनिर्भरतेणे करता येईल व बचत गटांतील महिलांना कसे अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांच्या आर्थिक समस्या मिटविण्यासाठी दोन हातांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल व बचत गटात कसे काम केले पाहिजे याचे अनमोल मार्गदर्शन केले.

स्वप्नील इंगळे यांनी कोरोनाच्या काळातील मानवी जीवनावश्यक गरजा यासंदर्भात वाढती बेरोजगारी आणि स्वयंरोजगार याविषयी माहिती विशद केली त्यानंतर उमेद बचत गटांच्या मार्फत उमेद पुरस्कार सन्मानित खंबाळे गावच्या जया बदादे यांनी महिलांना प्रोत्साहन देणारे अनुभव सांगत मार्गदर्शन केले. आजची प्रत्येक महिला बघिणी ही सक्षम आहे. महिलांना प्रत्येक क्षेत्रात चांगली संधी असून प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रगण्य आहेतच पण पन्नास टक्के आरक्षण महिलांना असूनही चूल आणि मूल इथपर्यंत महिला न ठेवता तिचा प्रत्येक क्षेत्रात उद्धार करून एक नवी उमेद, नवी ऊर्जा महिलांच्या मार्फत निर्माण करण्याचे व्यासपीठ म्हणजे महिला बचत गट आहे. यामध्ये प्रत्येक महिलांच्या कलागुणांना कार्यकुशलतेला वाव मिळतो आहे. आणि आजच्या युगात प्रत्येक ठिकाणी महिला काही कमी नाही. लिज्जत पापड हे देखील एका बचत गटांतील महिलेचे पेटंट ब्रँडिंग प्रॉडक्ट आहे असे प्रतिपादन प्रमुख उपस्थिती म्हणून सभापती सोमनाथ जोशी यांनी केले. यानंतर सरपंच ताराबाई बांबळे यांनी सर्व महिलांना बचत गटांच्या मार्फत उन्नती करण्यासाठी प्रोत्साहित करून सर्वांनी प्रयत्नशील असायला हवे असे आवाहन केले. यावेळी सर्व महिलांना बचत गटांच्या मार्फत असणारे फायदे, सुविधा, शासनाच्या बचत गट उन्नतीसाठी असलेल्या नवनवीन योजना यासंदर्भात दीपक भांगरे यांनी सर्व महिलांचे विविधांगी प्रश्न व त्यांचे उत्तर असा कार्यक्रम घेतला.

कार्यक्रमात महिलांना अर्थसहाय्य, प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये मोफत सबसिडी,कंपनीला डिपॉझिट स्वरूपात अनामत रक्कम भरण्यासाठी आर्थिक बीज भांडवल योजना, महिलांना कच्चा माल पुरविणे, बचत गटातील वस्तूंची नांमांकित कंपनीकडून खरेदी, बेरोजगार हातांना वर्षभर सिझनेबल स्वयंरोजगार आदी योजना व मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श अंगणवाडी सेविका मंगल डोळस यांनी केले तर आभार प्रदर्शन रुख्मिनी जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,प्राध्यापक निलेश गायकवाड, आदर्श अंगणवाडी सेविका मंगल डोळस, लता लहामटे, शिला लगड, दुर्गा जाधव, दुर्गा बांबळे, भारती लोखंडे, शमीन शेख, अनिता गायकवाड, पूर्वा दातरंगे,रंजना पाबळकर आदींसह अनेक महिलांनी प्रयत्न केले तर यावेळी वासाळी, मुंढेगावंसह सर्वच परिसरातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बचत गटांच्या मार्फत वाळवणं पदार्थ : लोणचे, पापड, वेफर, कुरडया, पापड्या, शेवया, डिंक लाडू, तांदूळ मिलिंग, हातसडीचा तांदूळ, शोभेच्या वस्तू, विणकाम,केक अगरबत्ती बनविणे, कापडी, कागदी पिशवी, मास्क, रुमाल बनविणे, सौंदर्य प्रसादने,बांबूच्या वस्तू, मसाल्याचे पदार्थ, टीका मसाला, पिकिंग पॅकिंग, मार्केटिंग, शेवया मशीन, शिलाई मशीन कामे, द्रोण पत्रावळी, पाने मशीन,सारीज सजावट याविषयी मार्गदर्शन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here