दिलीप बांबळे
सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील सर्वतिर्थ टाकेद येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता निमित्ताने टाकेद ग्रामपंचायतने घेतलेल्या रांगोळी स्पर्धे मध्ये गीता संजय वडोजीया यांचा प्रथम क्रमांक आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे यांच्या संकल्पनेतून मागिल वर्षा पासून अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी संपुर्ण गावातून मिरवणूक काढली जाते त्या निमित्त प्रत्येकाने घरासमोर रांगोळी काढावी वातावरण आनंदी रहावे मन प्रसन्न असावे या निमित्ताने रांगोळी स्पर्धेचे आयोजन मागील वर्षा पासून केले जात आहे. या स्पर्धे वेळी देव देवतांचे,निसर्गाचे,कोरोना वर आधारीत मास्क लावलेली रांगोळी, शिवाजी महाराजांचे चित्र साकारले होते.या वेळी प्रथम तीन क्रमांकाना व एक उत्तेजनार्थ बक्षिसे दिली. या वर्षी संपन्न झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक गीता संजय वडोजीया यांचा आला आहे तर द्वितीय क्रमांक शितल सुनिल गोसावी व निलेश भागाजी गायकवाड यांना विभागुण देण्यात आला तर तृतीय क्रमांक स्वराली श्रीराम लोहार व ऋतिका कमलाकर बांबळे यांना विभागूण देण्यात आला.तर ऊत्तेजनार्थ म्हणून दयाली अशोक पगारे यांना देण्यात आला.
या साठी परीक्षक म्हणून प्रा.संदिप ढोरकुले ,प्रा.ज्योती गायकवाड व आकाश रोंगटे हे होते. यशस्वी स्पर्धकांचे सरपंच ताराबाई रतन बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, श्रीराम लोहार, प्राचार्य तुकाराम साबळे , राजेंद्र गायकवाड , प्रकाश कदम, हरी कदम, सुनिल गोसावी अशोक महाले, राम शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
“मागील वर्षांपासून गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त शेवटच्या दिवशी सामुदायिक रांगोळी स्पर्धा घेण्याचा उपक्रम ग्रामपंचायत कडून राबविण्यात येत आहे. गावातील शालेय विद्यार्थी, महिला माताबघिणी इच्छुक स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देणारा हा स्तुत्य उपक्रम असून या स्पर्धेत पर्यावरणाचे जतन, बेटी बचाव बेटी पढाव, इंधन बचत, मास्क, हॅन्ड वॉश सॅनिटायझरचा करा पुरेपूर वापर ,कोरोना लसीकनाला देऊ साथ कोरोनावर करू मात अश्या परिस्थितीजन्य विषयावर रांगोळी काढत पंढरीच्या पांडुरंगाला रांगोळीच्या माध्यमातून साकडे घातले जात आहे.”
– प्रा.निलेश गायकवाड, द्वितीय क्रमांक निवडपात्र स्पर्धक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम