द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांना मंगळवारी (दि २२)रोजी पोलिसांनी आपला खाक्या दाखविल्याने त्यांची पळता भुई थोडी झाली .
कोरोना महामारी मुळे गेल्या अनेक दिवसांपासून शाळा ,महाविद्यालये बंद होती . हा आजार आता बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने आता शाळा महाविद्यालये सुरळीत सुरू झाली आहेत. देवळा महाविद्यालय परिसरात टवाळखोर व रोड रोमियोंचा सुळसुळाट वाढल्याने याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक टवाळखोर तरुण विद्यालयाच्या अवती भोवती फिरताना दिसत असल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे केल्याने मंगळवारी दि २२ रोजी पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे ,निलेश सावकार व अन्य पोलिसांनी देवळा महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या टवाळखोराना चांगला चोप दिल्याने त्यांची पळता भुई सपाट झाली.
महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरणाऱ्या टवाळ खोरांचे चांगलेच धाबे दणाणले असून , या कारवाईचे शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलीस ही कारवाई सुरूच ठेवावी अशी मागणी पालकांनी केली आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम