द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात Supreme Court सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान दिल्ली सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करून प्रदूषण कमी करण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली. दिल्ली सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की २१ नोव्हेंबरपर्यंत लागू केलेले निर्बंध २६ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आले आहेत. यासोबतच पार्किंग शुल्कात तीन ते चार पट वाढ करण्याची शिफारस स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणाकडे पाठवली आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे प्रदूषण कमी झाले, तुम्ही काय केले: SC
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात Supreme Court सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी प्रदूषण आधीच कमी झाल्याचे सांगितले आहे. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, प्रदूषण सरकारने उचललेल्या पावलांमुळे नव्हे तर जोरदार वाऱ्यांमुळे कमी झाले आहे. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमना यांनी विचारले,तर तुम्ही काय केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मंद वाऱ्यामुळे हवेची गुणवत्ता पुन्हा ‘खूप खराब’
मंद वारा आणि कमी तापमानामुळे बुधवारी सकाळी दिल्लीतील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ श्रेणीत नोंदवण्यात आली आणि सकाळी ९ वाजता हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३५७ वर राहिला. रविवारी आणि सोमवारी जोरदार वाऱ्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नोंदवण्यात आली. मंगळवारी २४ तासांची सरासरी AQI २९० होती. या महिन्यात दुस-यांदा अशी सुधारणा AQI मध्ये दिसली, जी आधी १ नोव्हेंबर रोजी २८१ वर होती.
बुधवारी, हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) फरीदाबादमध्ये ३४८, गाझियाबादमध्ये ३४६, ग्रेटर नोएडामध्ये ३२९, गुडगावमध्ये ३०८ आणि नोएडामध्ये ३२० होता. दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या प्रकरणी बुधवारी सुप्रीम कोर्टात Supreme Court सुनावणी झाली आणि त्यादरम्यान भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा म्हणाले की, प्रदूषण सरकारने उचललेल्या पावलांमुळे नाही तर जोरदार वाऱ्यांमुळे कमी झाले आहे म्हटले आहे.
वारा कधी वाईट मानला जातो?
जेव्हा हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) शून्य आणि ५० च्या दरम्यान असतो तेव्हा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) चांगला मानला जातो, तर ५१ आणि १००मधील AQI ‘समाधानकारक’ श्रेणीत मानला जातो. जेव्हा AQI १०१ ते २०० दरम्यान असतो तेव्हा प्रदूषण ‘मध्यम’ मानले जाते, तर २०१ ते ३०० दरम्यान ते खराब मानले जाते. ३०१ आणि ४०० मधील हवा ‘खूप खराब’ मानली जाते, तर ४०१ आणि ५०० मधील AQI ‘गंभीर’ श्रेणीत मानली जाते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम