जोपूळ सोसायटीवर संजय जाधव गटाची निर्विवाद सत्ता ; पस्तीस वर्षांची परंपरा अबाधित

0
14

विष्णू थोरे
चांदवड प्रतिनिधी : चांदवड तालुक्यातील आटीतटीच्या समजल्या जाणाऱ्या अन राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जोपूळ गावातील वि. कार्य. सेवा सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली असून, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्या विकास पॅनेलच्या १२ पैकी १२ जागा निवडून आल्या. जोपूळ सोसायटीची सभासद मतदार संख्या ८११ पैकी ७८७ मतदान झाले होते. यात विरोधी गुरुकृपा पॅनेलच्या उमेदवारांचा १०० ते १५० मतांच्या तफावतीने दारून पराभव झाल्याने तालुकाभर चर्चेला उधान आले आहे.

जोपूळ सोसायटीची निवडणूक रंगीत तालीम म्हणून पाहिली जात होती. गेल्या ३५ वर्षांपासून जोपूळ सोसायटीचा कारभार कै. रामभाऊ हरी जाधव, श्री. बाळू काळू पिंपरकर, श्री. संजय दगुजी जाधव यांच्या गटाकडे होता. “ सभासदांच्या हिताचा विचार करणारे संचालक मंडळ संस्थेत हवे, या हेतूने सभासदांनी आम्हाला कल दिला आहे. हि निवडणूक तरुणाईने हातात घेतली होती. जनतेपेक्षा मोठा कुणी नाही, त्यामुळे खोडसाळ राजकरण करणाऱ्या तालुक्यातील विरोधकांना जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे. संस्थेच्या विकासाची परंपरा टिकवून ठेवण्याची आमची जबाबदारी अधिकच वाढली आहे.” असे मत संस्थेचे सभापती व कॉंग्रसचे तालुकाध्यक्ष संजय दगुजी जाधव यांनी व्यक्त केले.

सर्वसाधारण गटातून संजय दगुजी जाधव (४३४ मते), दत्तू पंढरीनाथ कोतवाल (४०६ मते) , अरुण देवराम जाधव ( ४०३ मते), भाऊसाहेब ज्ञानेश्वर वाघ (४०३ मते), केदू दौलत सावकार (३९९ मते), कैलास रामभाऊ जाधव (३८८ मते), लक्ष्मण शंकर जाधव (३८४ मते), बाळू हरी जाधव (३७८ मते) , महिला राखीव गटातून सौ. अनिता धोंडीराम पिंपरकर (४२८ मते), सौ. मीराबाई भाऊसाहेब धामणे ( ४१८ मते), अनुसूचित जाती जमाती गटातून परशराम प्रकाश केदारे ( ४३५ मते), इतरमागास गटातून दीपक भिका वाघ ( ४१२ मते) मिळवून दणदणीत विजय प्राप्त केला आहे.

या निवडणुकीत श्री पोपट पाटोळे साहेब यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडले. यावेळी नितीन पाटील, संस्थेचे सचिव संजय ठोंबरे, लिपिक संदीप वक्ते, राहुल केदारे यांनी सहकार्य केले. यावेळी जयराम कोतवाल, पप्पू कोतवाल, कैलास सावकार, रमण हरी जाधव, पंडित जाधव, जयवंत जाधव, दत्तू दामू जाधव, संदीप लहानू जाधव, अशोक सदू जाधव, अण्णा कोतवाल, बबन पिंपरकर, मधुकर धामणे, अमोल धामणे, मोठाभाऊ वाघ, पोपट रेवजी वाघ, नंदू नामदेव वाघ, विलास जाधव, सोनू जाधव, रामदास सावकार, योगेश रघुनाथ जाधव, धोंडीराम सीताराम जाधव, त्र्यंबक सावकार, अर्जुन जाधव, पांडुरंग जाधव, साहेबराव जाधव, सोमनाथ जाधव, प्रभाकर जाधव, भाऊसाहेब जाधव, संजय पुंडलिक जाधव, ज्ञानेश्वर कोतवाल, गोरख कोतवाल, दिपांषु जाधव, किशोर जाधव, कचरू केदारे, सीताराम सावकार, बाळासाहेब जाधव, दादा धोंडी जाधव, उत्तम जाधव, शिवाजी जाधव , मनोहर जाधव, सुभाष जाधव, संजय सोनावणे, शिवाजी वाघ, दिगंबर कोतवाल, दादा दाते, दिलीप पिंपरकर, अमोल जाधव, अण्णा जाधव, रवींद्र केदारे, विठ्ठल गोधडे, कृष्णा केदारे, वैभव केदारे, त्र्यंबक जाधव आदींनी विजयासाठी योगदान दिले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here