जे भल्याभल्यांना नाही जमलं ते केदा आहेरांनी करून दाखवले

0
13

नाशिक प्रतिनिधी : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले त्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत, भारती पवारांसह झिरवळना देखील धक्का बसला आहे, दिगगजांना धक्का बसत असतांना भल्याभल्यांना नाही जमलं ते भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेरांनी करून दाखवले , अनेकांचे बुरुज ढासळले मात्र केदा आहेरांनी देवळ्याचा बालेकिल्ला मोठ्या नेटाने सांभाळला अन जिल्ह्यात देखील त्यांच्या नेतृत्वात सर्वाधिक नगरसेवक निवडुन आलेत.

नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीचे निकाल घोषित झाले जवळपास सर्वच पक्षांना मतदारांनी समान संधी दिली आहे. सहा पैकी भाजपने दोन व राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन नगरपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. शिवसेनेला निफाड नगरपंचायत जिंकली आहे. तर, महाविकास आघाडीनं एका पंचायतीवर वर्चस्व सिद्ध केलं आहे. या निकालांनी प्रस्थापितांच्या वर्चस्वाला मात्र अनेक ठिकाणी धक्के दिले आहेत.

या नगरपंचायत निकालांमध्ये कृषीमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी आमदार दिलीप बनकर यांना धक्का बसला आहे. निफाड नगरपंचायतीमध्ये सेनेने दमदार एन्ट्री करत भाजपला धक्का दिला. निफाडमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर पेठ नगरपंचायतीत शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देत राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे.

सर्व बुरुज ढासळत असतांना भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी मात्र आपला बुरुज ढासळू न देता 15-2 या फरकाने दणदणीत विजय मिळवला, केदा आहेरांवर मतदारांनी टाकलेला विश्वास हा मोठा असून त्या विश्वासाला नाना सार्थ उतरतात का हा येणारा काळच सांगेल. जनतेच्या मात्र केदा आहेरांकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

कुठं कोणाची सत्ता बघा सविस्तर……
सुरगाणा नगरपंचायत – भाजप

एकूण जागा – १७
शिवसेना – ०६
भाजप – ०८
माकप – ०२
राष्ट्रवादी काँग्रेस – ०१
——-
देवळा नगरपंचायत – भाजप

एकूण जागा – १७
भाजप – १५
राष्ट्रवादीला – ०२
——-
निफाड – शिवसेना

एकूण जागा – १७
शिवसेना- ०७
राष्ट्रवादी काँग्रेस- ०३
काँग्रेस – ०१
शहर विकास आघाडी – ०४
बसपा- ०१
इतर(अपक्ष)- ०१
——
कळवण – राष्ट्रवादी काँग्रेस

एकूण जागा – १७
राष्ट्रवादी – ०९
भाजप – ०२
काँग्रेस – ०३
शिवसेना – ०२
मनसे – ०१
—–
पेठ – राष्ट्रवादी काँग्रेस

एकूण जागा – १७
राष्ट्रवादी – ०८
शिवसेना – ०४
माकप – ०३
भाजप – ०१
अपक्ष – ०१
——
दिंडोरी – महाविकास आघाडी

एकूण जागा – १७
राष्ट्रवादी – ०५
शिवसेना – ०६
काँग्रेस – ०२
भाजपा – ०४


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here