प्रश्नः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची अवमानकारक माहिती कोणी पुरवली होती?
उत्तर (जेम्स लेन): तुम्ही प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. मला कोणीही माहिती पुरवली नाही. माझे पुस्तक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कथांबद्दल आहे. या कथा सांगत असलेल्या लोकांनी काय Narrative सेट करून ठेवलंय त्याबद्दल आहे. काही लोक रामदास यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात, तर काही तुकाराम महाराज यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात. यातलं काय खरं आहे, त्यात मला काहीही रस नाही. पण एक गट पहिल्या Narrative च्या बाजूने आहे तर दुसरा दुसऱ्या narrative च्या बाजूने. असं का?
प्रश्न: तुमच्याकडे असलेल्या अवमानकारक माहितीचा आधार काय?
उत्तर (जेम्स लेन): माझं पुस्तक काळजीपूर्वक वाचणाऱ्याच्या लक्षात येईल की मी कुठलंही ऐतिहासिक तथ्य मांडल्याचा दावा केलेला नाही. मी शिवाजी महाराजांचा अवमान केलाय, अशी टीका करणाऱ्यांनी चुकीचा अर्थ काढलाय. पुन्हा सांगतो मी कथांबद्दल बोलतोय, इतिहासातील तथ्यांबद्दल नाही.
प्रश्न: या विषयाबाबत तुमचं बाबासाहेब पुरंदरेंशी बोलणं झालं होतं का? त्यांचं म्हणणं काय होतं?
उत्तर (जेम्स लेन): मी कधीही बाबासाहेब पुरंदरेंशी एका शब्दानेही बोललेलो नाही.
प्रश्न: महाराजांबद्दलचे अवमानकारक शब्द तुम्ही मागे घेतले. ते कशामुळे?
उत्तर (जेम्स लेन): युक्तिवाद करताना मी पुरेशी काळजी घेतली नाही आणि त्याचा परिणाम इतरांना भोगावा लागला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम